शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार-बसची धडक

By admin | Updated: May 31, 2016 00:42 IST

पाचोड : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडजवळ एका ढाब्यासमोर रविवारी (दि.२९) मध्यरात्री एस.टी. महामंडळाची बस व कार यांच्यात झालेल्या अपघातात २५ जण जखमी झाले.

पाचोड : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडजवळ एका ढाब्यासमोर रविवारी (दि.२९) मध्यरात्री एस.टी. महामंडळाची बस व कार यांच्यात झालेल्या अपघातात २५ जण जखमी झाले. लातूर डेपोची औरंगाबाद ते लातूर ही बस (क्र. एमएच २० बीएल २२१७) ही गाडी रविवारी रात्री औरंगाबादहून लातूरकडे चालली होती. बीडहून कार ( क्र. एमएच २0 सीएस ६0५३) औरंगाबादकडे जात असताना बस व कार यांचा समोरासमोर जोरदार अपघात झाला. त्यात बसमधील विश्वास संपत सोपाथी (४0, रा. औरंगाबाद), संजय शिवलाल मरिहंगर (६0, रा. लातूर), कालिका व्यंकटराव (६५, रा. औरंगाबाद), सुनील रामसिंग (४५, रा. दोंदडगाव), फारुकी फैजल (२५, रा. बीड), हनुमंत बाबुराव (५५, रा. गंगापूर), रमाकांत साहेबराव (५५, रा. अंबाजोगाई), शेख सलीम (३२, रा. बीड), सय्यद मिशाद (२६, रा. बीड), श्रीकांत धनशाम इंदानी (४३, रा. वडीगोद्री), अश्विनी सिरसाठ (२३, रा. पाटोदा), अशोक सिरसाठ (२६, रा. पाटोदा), शोभा निदेश गवई (४२, नवसाळी), दिनेश सोपान गवई (५0 रा. नवसाळी), शारदा श्रीराम सुवसे (३0, रा. शेवता), श्रीराम शिवाजी (३४, रा. शेवता), संतोष जगताप (३५,रा. पाचोड), सुनीता लक्ष्मण (३0, रा. दावरवाडी) जखमी झाले.अपघाताचा आवाज होताच आजूबाजूला ढाब्यावर असलेल्या नागरिकांनी तिकडे धाव घेतली. पाचोड पोलिसांना माहिती दिली. अपघातामुळे काही वेळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाचोडचे सपोनि महेश आंधळे यांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करून दिली. यानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. यावेळी डॉ. प्रवीण बोडेवार, डॉ. साकीब सौदागर, अधिपरिचारिका दीपा साळवे, श्रीलंका पवार यांनी उपचार केले. बसमधील जखमी प्रवासी श्रीकांत इंदाणी (रा. बदनापूर) म्हणाले की, अपघात समोरासमोर झाला. यात ३0 ते ३५ जण जखमी झाले. काही जखमी प्रवासी तात्काळ खासगी रुग्णालयात निघून गेल्यामुळे त्यांची नावे समजू शकली नाहीत.