शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उपसचिवांकडून शौचालय कामांचा आढावा

By admin | Updated: January 21, 2017 00:12 IST

जालना : शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर पालिकेने प्रयत्न करावेत, अशा सूचना नगर विकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी दिल्या.

जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर पालिकेने ठोस पावले उचलून प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय उभारणीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना नगर विकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनीही शौचालयांची कामे गती करण्याचे आवाहन नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केले. शुक्रवारी सायंकाळी उपसचिव बोबडे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आदींनी नगर पालिकेत शौचालय बांधकाम तसेच झालेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह स्वच्छता तसेच मालमत्ता विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बोबडे यांनी शहरात झालेली शौचायलयांची किती कामे झाली आहेत, किती प्रलंबित आहेत अनुदान किती वाटप केले याची माहिती घेतली. ३१ मार्च अखेर संपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी जोंधळे यांनीही मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. सुमारे तासभर उपसचिव बोबडे व जिल्हाधिकारी जोंधळे यांनी आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.बोबडे यांनी आत्तापर्यंत अनुदान कसे वाटप झाले अथवा कसे करावे याबाबत मार्गदर्शन सूचना दिल्या. काही त्रुटी असतील त्या विचारण्याचे आवाहनही केले. एकूणच ३१ मार्च अखेर उद्दिष्ट पूर्ण करण्याचे कडक सूचना यावेळी देण्यात आल्या. शहरात सुरू असलेल्या बांधकामाची स्थिती तसेच दर्जाबाबत ही यावेळी बोबडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या. संबंधितांनी अनुदान घेतल्यावर त्याचे बांधकाम केले की नाही याबाबतही चौकशी करून तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.