शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा घेणार आढावा

By admin | Updated: April 20, 2016 23:49 IST

बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रा. काँ. च्या खा. सुप्रिया सुळे हे दुष्काळ पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सुळे या गुरूवारी त

बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रा. काँ. च्या खा. सुप्रिया सुळे हे दुष्काळ पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सुळे या गुरूवारी तर ठाकरे हे शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होत आहेत. हे दोन्ही दिग्गज सत्तेबाहेर आहेत; परंतु त्यांच्या दौऱ्यांकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.राज ठाकरे व सुप्रिया सुळे हे दोघेही सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. सुळे या गुरूवारी गेवराईतील प्रकल्प जलशारदा अंतर्गत कार्यान्वित विविध जलसंधारण प्रकल्पांना भेटी देणार आहेत. दुपारी १२ वाजता धोंडराई येथे माती बंधारा व अमृता नदीच्या पुनरूज्जीवन कामाची पाहणी करतील. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी १ वा. पेंडगांव (ता. बीड) येथे बांधलेला सिमेंट बंधारा आणि नदीच्या विस्तारीकरण कामास भेट देणार आहेत. त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित, आ. सतीश चव्हाण, रा. काँ. जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी मंत्री प्रकाश सोळंके राहतील. शुक्रवारी पाटोदा, अंबाजोगाई, केज येथे त्यांचा दौरा आहे.राज ठाकरे शुक्रवारी दुपारी दोन वाजता अंबाजोगाईत पोहचणार आहेत. योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन ते न्यायालयातील तारखेला उपस्थित राहतील. त्यानंतर परळीत ते मुक्कामी राहणार आहेत. शनिवारी परळी वैजनाथाचे दर्शन घेऊन ते दुष्काळी परिस्थितीत पक्षाने सुरू केलेल्या कामांची पाहणी करणार आहेत. वडवणी तालुक्यातील मोरवड, बाहेगव्हाण, पुसरा, हिवरगव्हाणमध्ये ते भेट देणार आहेत.दुपारी ३ वाजता मराठवाड्यातील स्वयंसेवी संस्थांच्या संचालकांची बैठक घेऊन ते बीडमध्ये मुक्काम करतील. रविवारी बिंदुसरा धरणाची पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर कपिलधार येथे दर्शन घेतील. बीड तालुक्यातील वडवाडी, बोरखेड, लोणी येथे दुष्काळी पाहणी करणार आहेत. सोमवारी न्यायालयात हजर राहून येवलवाडी (ता. पाटोदा) व त्यानंतर शिरूर कासारला दौरा आहे. नंतर गेवराई मार्गे ते जालन्याकडे रवाना होणार आहेत. (प्रतिनिधी)मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चार दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर असून, सलग तीन दिवस मुक्कामी राहणार आहेत. ते पहिल्यांदाच एवढे दिवस बीड मुक्कामी असणार आहेत. त्यांचा एक मुक्काम पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या परळी येथे आहे. या दौऱ्यात दुष्काळ पाहणीसोबतच राजकीय खलबते देखील होतील, अशी शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांचे मतभेद व हेवेदावे हे मुद्दे वादळी ठरणार आहेत.