शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी उपसाप्रकरणी महसूलने केली कारवाई

By admin | Updated: December 25, 2016 00:07 IST

जाफराबाद : शेतीसाठी अवैध पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात महसूल विभागाने धडक मोहीम सुरु केली आहे.

जाफराबाद : शेतीसाठी अवैध पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात महसूल विभागाने धडक मोहीम सुरु केली आहे. तहसीलच्या पथकाने बुधवारी वरूड बुद्रुक येथील तलाव क्र मांक एक मध्ये पाणी उपसा करीत असलेले पाच विद्युत पंप, दोन इंजिन व इतर साहित्य जप्त केले.महसूल विभागाची परवानगी न घेता विविध प्रकल्पातून शेतकरी मोठ्या प्रमाणात अवैध पाणी उपसा करत होते. याबाबत अनेक तक्रारी महसूल विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी महसूल विभागाने धडक कारवाई करत शेतकऱ्यांचे वीजपंप, इंजिन आणि केबल व इतर साहित्य जप्त केले. पाणी उपसा परवाना नसताना विना परवानगी पाणी उपसा करताना काही शेतकरी आढळून आल्याने नायब तहसीलदार बी. के. चंडोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना ग्रामस्थांना करावा लागला. त्यातच जाफराबाद तालुक्यात अनेक गावात पाणीटंचाई होती. यंदा चांगला पाऊस झाल्याने परिसरातील प्रकल्पात चांगले पाणी आहे. शेतकऱ्यांच्या विहिरींना सुध्दा चांगले पाणी आहे. शेतकरी प्रकल्पाच्या पाण्याची चोरी करत असल्याने प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महसूल विभागाने आत्तापासूनच उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ही धडक मोहीम राबविण्यात आली आहे. अवैध पाणी उपसा करू नये, असे नायब तहसीलदार चंडोळ यांनी आवाहन केले आहे. या कारवाईत महसूल पथक लघु पाटबंधारे विभाग, वीज वितरण कंपनीमधील अधिकारी यांना सोबत घेऊन पाणी चोरी करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. या पथकामध्ये नायब तहसीलदार बी. के. चंडोळ, कनिष्ठ अभियंता व्ही. के. खंबाट, मंडळ अधिकारी एस. डी. भदरगे, एस. बी. काळे, महावितरणचे सुभाष कुलकर्णी यांचा समावेश आहे. (वार्ताहर)