बीड: महसूल विभागात काम करणाऱ्या शिपायाच्या सेवानिवृत्ती नंतर त्यांच्या कुटुंबातील त्याच्या एका पाल्याला नोकरीत घ्या, लिपिकांना महसूल सहाय्यक हे पदनाम द्यावे. यासह विविध मागण्यांच्या संदर्भात महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबले असल्याचा प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात आला.यापूर्वी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तीन टप्प्यात आंदोलन करून मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र शासन महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने चौथ्या टप्यात महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात ग्रामीण भागातून आलेले नागरिक कामासाठी ताटकळत बसले होते. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की, गृह विभागाच्या धरतीवर महसूल कर्मचाऱ्यांसाठी ५ टक्के जादा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जागा राखीव ठेवाव्यात. नायब तहसीलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरावेत, या मागण्या महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून शासनाकडे करण्यातयेत आहेत. परंतु शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. गावपातळीवर कोतवाल मागील अनेक वर्षांपासून सेवा करतात. मात्र त्यांना अद्यापपर्यंत शासनाने चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील कोतवालांमध्ये असुरिक्षतेची भावना निर्माण झालेली आहे. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचे महसूल संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोगदंड यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सुहास हजारे, सचिव महादेव चौरे, नितीन जाधव, सचिन गायकवाड, बालाजी कचरे, हेमलता परचाके, सचिन देशपांडे, राजश्री आचार्य, गिरीश सरकलवाड आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांनी जनतेची विश्वासार्हता मिळवावी - जिल्हाधिकारी रामसर्वसामान्य जनतेची कार्यालयीन कामे वेळेवर झाली नाहीत तर प्रशासनाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. बीड जिल्ह्याची प्रतिमा राज्यस्तरावर उंचविण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचारयाने प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत शुक्रवारी महसूल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी राम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मागील वर्षात महसूल विभागात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या २९ अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. व्यासपिठावर अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलिस अधिक्षक नविनचंद्र रेड्डी, निवासी जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उप जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, पुरवठा अधिकारी एस. व्ही. सुर्यवंशी, सविता चौधर, तहसीलदार ज्योती पवार आदींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे विविध मागण्यासंदर्भात महसूल कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप सुरू असताना देखील कर्मचाऱ्यांची कार्यक्रमाला मोठी उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दुसऱ्याशी समन्वय ठेवून काम केले पाहिजे, आज स्थितीत जी यंत्र सामुग्री उपलब्ध आहे. त्याच्या साह्याने काम करून दाखवणे खरे आव्हानात्मक असते. यावेळी गतवर्षात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महसूल विभागातील २९ जणांचा गौरव जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये उप जिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार संदीप कुलकर्णी, नायब तहसिलदार व्हि. एच. जोशी, विलास तरंगे, लघुलेखक सदाशिव लिमकर, अव्वल कारकुन पी. व्ही. कुडदे, शेख सलीम शेख अब्दुला, मंडळ अधिकारी आर. आय. केलुरकर, ए. एन. भंडारे, तलाठी एफ. एम. हांगे, गंगाधर राजूरे, लिपीक. जी. व्ही. घडलिंगे, व्ही. आर. दिवटे, जे. डी. पठाण, कमलेश पाटील, भरत भडाणे, सोमनाथ कुरणे, वाहनचालक शेख नसीर शेख अमीर, शिपाई बी. बी. कुलकणी, मोहम्मद सादेक, शांताबाई शिंदे, कोतवाल काशिनाथ मस्के, श्रीधर जगताप आदींचा समावेश आहे.कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार जोपर्यंत शासन राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा कर्मचाऱ्यांनी दिला इशाराअनेक वर्षांपासून मागणी करुनही शासनाचे दुर्लक्षसंपामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली असल्याचे चित्र शुक्रवारी पहावयास मिळाले
महसूल दिनी कर्मचाऱ्यांचा संप
By admin | Updated: August 2, 2014 01:49 IST