शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

निकाल लागले आता ‘पंचाईत’ सरपंचपदासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:06 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल सोमवारी जाहीर झाले असले तरी सरपंचपदासाठी मोठी ‘पंचाईत’ निर्माण झाली आहे. निवडणूक ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल सोमवारी जाहीर झाले असले तरी सरपंचपदासाठी मोठी ‘पंचाईत’ निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाने सरपंचपदासाठी सोडत होत नाही, तोपर्यंत विजयी उमेदवारांना भाव येणार नाही. असे असले तरी चक्रानुक्रमानुसार ग्रामपंचायतीचे सरपंचपद ज्या प्रवर्गासाठी सुटणार आहे, त्यांनी मात्र अंदाज बांधून सदस्यांची पळवापळवी करीत सहलींच्या नियोजनाची सुरुवात केली आहे.

काही ग्रामपंचायतींमध्ये पूर्ण पॅनल पडले, पण राखीव प्रवर्गातील उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्या सदस्यांना मोठा भाव आलेला आहे. राखीव प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित झाले तर सदरील सदस्याला आतापासूनच मर्जीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

जिल्ह्यातील ६१७पैकी ३०८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होणे शक्य आहे. उर्वरित ३०९ ग्रामपंचायतीतील सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल. १५४ ओबीसी प्रगर्वासाठी त्यातील ७७ महिलांसाठी, तर अनुसूचित जाती, जमातीसाठी असलेल्या १५४ पदांमधून ७७ पदे महिलांसाठी आरक्षित होणे शक्य आहे. तसेच खुल्या प्रवर्गातील ३०९ पदांमधून ५० टक्के पदे महिलांसाठी आरक्षित होणे शक्य आहे. हे सगळे आरक्षण पाहता बहुतांश पॅनलकडे उमेदवार नाहीत. त्यामुळे सरपंचपद आरक्षित प्रवर्गाकडे गेल्यास आतापासूनच सर्वांनी तयारी सुरू केली आहे.

तांत्रिक अडचणी काही ठिकाणी होतील

काँग्रेसचे जिल्हाप्रमुख माजी आमदार कल्याण काळे म्हणाले, पहिल्यांदा तर जिल्ह्यातील सर्व सोडती निघाल्या आहेत. त्यामुळे सरपंचपद समोर ठेवूनच लोकांनी निवडणूक लढविली. मात्र, सरकारने सार्वत्रिक निवडणुकांनंतर सरपंचपदासाठी आरक्षण घेण्याचे ठरविले. पण, निवडणुकापूर्वीचे आरक्षण बेकायदेशीर होते, असे म्हणता येणार नाही. ज्या ठिकाणी ११ सदस्य पॅनलचे निवडून आले असतील तर तेथे जुनी काय नवी सोडत असू द्या, काही अडचण येणार नाही. ज्या ग्रामपंचायती बहुमतात तेथे अडचण नाही. तांत्रिक अडचण तेथेच होईल, जेथे आरक्षण वेगळे असेल आणि उमेदवार उपलब्ध नसेल. त्यामुळे सध्या कुणीही कोणतेही मनोरे रचत नसल्याचे चित्र आहे.

जोपर्यंत सोडत नाही तोवर काहीच नाही

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले की, जोपर्यंत सरपंचपदासाठी सोडत जाहीर होत नाही तोपर्यंत काहीच करता येणार नाही. काही पॅनलकडे अनुसूचित जमाती, जाती, ओबीसीचे उमेदवार आहेत. बहुमत असूनही राखीव प्रवर्गाचे उमेदवार निवडून आलेले नाहीत. त्यामुळे सोडतीनंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी तालुकापातळीवर गोळाबेरीज सुरू आहे. सोडतीनंतरच फोडाफोडी, पळवापळवीसाठी प्रयत्न सुरू होतील, असा माझा अंदाज आहे. सध्या कोणतेही चित्र स्पष्ट नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे, ते गेले असतील बाहेर, परंतु आरक्षण सोडतीची वाट पाहणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींतील उमेदवार आहेत. कुणीही सध्या पुढे येण्यास तयार नाही.