जालना : इयत्ता बारावीचा जिल्ह्याचा निकाल ८९.८७ टक्के इतका लागला आहे. एकूण १५ हजार ३१५ पैकी १३ हजार ७६३ विद्यार्थी विशेष प्राविण्य, प्रथम, द्वितीय व सर्वसाधारण उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीपेक्षा सरासरी ७ टक्क्यांनी जिल्ह्याच्या निकालात वाढ झाली आहे. निकालामध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. बारावीचा आॅनलाईन निकाल लागणार असल्याने सोमवारी विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले होते. सकाळी ११ वाजेपासून शहरातील विविध इंटरनेट कॅफेवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. दुपारी १२ नंतर निकाल उपलब्ध होऊ लागले होते. काही विद्यार्थ्यांनी आपला आनंद बॅन्डबाजाच्या तालावर ठेका धरून व्यक्त केला. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाचा निकाल ९८.३१ टक्के इतका लागला. विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. कला शाखेचा ९५.५५ तर वाणिज्य शाखेचा निकाल ९८.८७ टक्के लागला. वाणिज्य शाखेतून पूजा अग्रवाल हिने ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कला शाखेतून रामेश्वर काळे याने ८९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बद्रीनारायण बारवाले, व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. उषा झेर, राजेंद्र बारवाले, प्राचार्य डॉ. कविता प्राशर, मार्गदर्शक डॉ. एस.एन. संदीकर व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाचा निकाल ८९ टक्के इतका लागला. विज्ञान शाखेतून शेख रिमा रियाहिन अब्दूल हाफिज या विद्यार्थिनीने ८८ टक्के गुण मिळवत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. तर प्राची सराफ (८७.५), प्रणव प्रमोद पाटील (८७.५) यांनी द्वितीय, अंकिता सुनील बियाणी व अजिंक्य राजेश अग्रवाल (८७.३) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायणराव मुंढे, सचिव प्रा. सत्संग मुंढे, प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके, अधीक्षक भास्कर शिंदे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शेख रिमा रियाहिन हिचा सत्कार करण्यात आला. पालकांमधून अब्दूल हाफिज व समीना यास्मीन उपस्थित होते. उर्दू ज्युनिअर महाविद्यालय विज्ञान व कला शाखेचा निकाल ९९ टक्के लागला आहे. कॉलेजमधून १३७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १३५ विद्यार्थी विशेष प्राविण्य, प्रथम व द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. उर्दू, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, रसायनशास्त्र , अरेबीक, जीवशास्त्र या विषयाचा महाविद्यालयाचा निकाल १०० लागला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकरराव राख, सचिव डॉ. मोहम्मद बद्रोद्दीन, मुख्याध्यापक मो. इफ्तेखारोद्दीन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मत्स्योदरी महाविद्यालयाचा निकाल अनुक्रमे कला शाखा ७३.३८ टक्के, विज्ञान शाखा ८९.८३, वाणिज्य शाखा ८९.५७ तर एम.सी.व्ही.सी. शाखेचा निकाल ८९.०९ टक्के लागला. यात वर्षा दौलत बेवले, अनिल बाबूलाल पिंपराळे, करण किशोर बारहाते, परवेज रहिमोद्दीन अन्सारी यांनी विशेष प्राविण्य घेऊन यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी खा. अंकुशराव टोपे, सचिव पालकमंत्री राजेश टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी.आर. गायकवाड, प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड आदींनी कौतुक केले. जेईएस महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ९०.८, वाणिज्य ८७.२, कला ८०.८ आणि एम.सी.व्ही.सी. ९० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतून ९१.३८ टक्के गुण मिळवून अभिजय पगारे व आय.व्ही. लुणिया यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कला शाखेतून पवार के.जी. ८१.३८ याने प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल, उपप्राचार्य आर.व्ही. आरबड, पर्यवेक्षक व्ही.व्ही. जगताप, प्रा. मुरलीधर गोल्हार आदींनी कौतुक केले. म.स्था. जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८ टक्के लागला आहे. रुपाली रमेश पेरे ही विद्यार्थिनी ५०९ गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे अध्यक्ष अजितराज कोठारी, सचिव स्वरूपचंद ललवाणी, प्राचार्य वानगोता व इतरांनी कौतुक केले आहे. जालना तालुक्यातील वखारी येथील ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कविता शिवाजी शिंदे हिने ८१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव घुले पाटील, सचिव रवि घुले पाटील आदींनी कौतुक केले आहे. जिल्ह्यात यंदा निकालात ७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती शैक्षणिक विभागातील सूत्रांनी दिली. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल सरासरी ८२ टक्के लागला होता. उत्तीर्ण होण्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे. (प्रतिनिधी) शहरात बहुतांश भागात आज दिवसभर वीजपुरवठा खंडित असल्याने नेट कॅफेवर इन्व्हर्टरचा बॅकअप लवकर संपला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. विशेष म्हणजे शहरातील विविध महाविद्यालयांनाही या भारनियमनाचा फटका बसला. तेथील प्राध्यापक मंडळी महाविद्यालयाचा आॅनलाईन निकाल नोंदविण्यासाठी सज्ज होती. परंतु, भारनियमनामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागला. सायंकाळीही काही भागातील वीजपुरवठा खंडित होता. ४निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी नेट कॅफेवर गेले. तेथे विद्यार्थ्यांचा परीक्षा क्रमांक तसेच आईचे नाव टाईप केल्यावरच विद्यार्थ्यांचा निकाल पाहावयास मिळत होता. दृष्टिपथात जिल्ह्याचा निकाल शाखा विशेष प्राविण्यप्रथमद्वितीयपासएकूण टक्केवारी विज्ञान१२४१७८७२१६८५५४१३८९३.५१ कला५८२९५८३२६५२१०३७९२०८७.८० वाणिज्य१७१६६७५३३२११३९२९१.०८ व्होकेशनल२२१६७१२८०३१७८७.३७ एकूण८८५७२०९५९८११७९१३७६३८९.८७
जिल्ह्याचा निकाल ८९.८७ टक्के
By admin | Updated: June 3, 2014 00:43 IST