शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

खासगी संस्थाचालकांच्या शाळाबंद आंदोलनाला प्रतिसाद

By admin | Updated: July 5, 2016 00:06 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी एकदिवसीय शाळा बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी एकदिवसीय शाळा बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. समितीच्या सदस्यांनी विविध शाळांमध्ये जाऊन शाळा बंद करण्याची विनंती केली. तरी काही शाळा आंदोलन सुरू असतानाही सुरूच होत्या. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीपासून आंदोलनाचा इशारा देणाऱ्या खासगी शिक्षण संस्थाचालकांनी आज शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेतला होता. राज्यातील खासगी शाळांमध्ये एक दिवस बंद पाळत शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले होते. शाळा बंदचा इशारा दिल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. शाळा बंद करण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध शाळांसमोर जाऊन आंदोलन केले. शिशु विकास मंदिर, अनंत भालेराव विद्या मंदिर, श्रेयस हायस्कूल, जागृती हायस्कूल, ज्ञानप्रकाश विद्या मंदिर, रेणुका हायस्कूल अशा शाळांमध्ये जात शाळा बंद करण्याचे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनोज पाटील, वाल्मीक सुरासे, मोहन सोनवणे, सुभाष महेर, नामदेव सोनवणे, भाऊसाहेब कराळे, पंडित डोंगरे, अंकुश पाल, पांडुरंग गोकुंडे, विजय द्वारकुंडे, हरी मोहिते, मंगला हुमे, राजेश घाटे, आनंद खरात, महेश पाटील यांनी परिश्रम घेतले. अशा आहेत मागण्या...घोषित शाळांना प्रचलित नियमानुसार पात्र टप्प्याचे अनुदान त्वरित देण्यात यावे, अघोषित शाळांना त्वरित घोषित करून अनुदानाची तरतूद करण्यात यावी, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम राखावी. २८ आॅगस्टचा निर्णय रद्द करावा इ. मागण्या आहेत. शासनाने चर्चेला बोलावून योग्य निर्णय न घेतल्यास २९ जुलैपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शाळांनी शाळा बंद आंदोलनात सहभाग घेतल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी केला.