शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

भावी १० गुरुजींवर रेस्टिकेटची कारवाई

By admin | Updated: June 12, 2014 01:38 IST

लातूर : डीटीएड्. अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झाल्या असून, बुधवारी इंग्रजीच्या पेपरमध्ये लातूर शहरातील एका परीक्षा केंद्रावर गाईडचा वापर करून नकला करताना १० भावी गुरुजींना बैठे पथकाने पकडले.

लातूर : डीटीएड्. अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झाल्या असून, बुधवारी इंग्रजीच्या पेपरमध्ये लातूर शहरातील एका परीक्षा केंद्रावर गाईडचा वापर करून नकला करताना १० भावी गुरुजींना बैठे पथकाने पकडले. त्यांच्यावर रेस्टिकेटची कारवाई पथकाने केली आहे. लातूर शहरातील व्यंकटराव परगे अध्यापक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर डीटीएड्.च्या इंग्रजी विषयाची परीक्षा बुधवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत घेण्यात आली. या परीक्षेत १० परीक्षार्थी गाईडची पाने फाडून नकला करीत असताना बैठे पथकाच्या निदर्शनास आले. दरम्यान, बैठे पथकाचे प्रमुख मुख्याध्यापक भारत सातपुते, उपशिक्षणाधिकारी शोभा येळूरकर, विस्तार अधिकारी एस.डी. बिराजदार यांनी गैरप्रकार करणाऱ्या या परीक्षार्थ्यांच्या नकला व उत्तरपत्रिका ताब्यात घेऊन त्यांच्यावर रेस्टिकेटची कारवाई केली आहे. पथकाने केलेल्या कारवाईचा अहवाल पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनाही पाठविण्यात आला आहे. आयुक्तांकडून या अहवालाची पडताळणी होणार असून, त्यानंतर पुढील किती परीक्षेला या विद्यार्थ्यांना निर्बंध घातले जातील, ते ठरणार आहे.दरम्यान, परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्र संचालक म्हणून ज्यांची नेमणूक या केंद्रावर करण्यात आली होती, त्यांना अचानक दुसऱ्या केंद्रावर पाठविण्यात आले होते. तर या केंद्रावर दुसऱ्या केंद्र संचालकांची नियुक्ती केली. हा बदल परीक्षा सुरू होण्यापूर्वीच झाला होता. पण बदल कशामुळे केला, याबाबत उलटसुलट चर्चा परीक्षा केंद्रावर होती. (प्रतिनिधी)शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी...व्यंकटराव परगे अध्यापक विद्यालयातील परीक्षा केंद्रात गैरप्रकाराची एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे, शिक्षण उपनिरीक्षक के.आर. शिंदे यांनी भेट दिली. परीक्षार्थी परीक्षा हॉलमध्ये आल्यानंतर त्यांची तपासणी केली नसल्याने बैठे पथकाला ही कारवाई करावी लागली. याबद्दल शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे पथक प्रमुखांनी सांगितले.