शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेने टाकलेले आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्द

By admin | Updated: November 19, 2015 00:25 IST

बीड : शहरातील महिला कला महाविद्यालयासमोरील १ हेक्टर ५२ आर जमिनीवर बीड नगर परिषदेने विकास आराखडयात टाकलेले शाळा व खेळाच्या मैदानाचे आरक्षण

बीड : शहरातील महिला कला महाविद्यालयासमोरील १ हेक्टर ५२ आर जमिनीवर बीड नगर परिषदेने विकास आराखडयात टाकलेले शाळा व खेळाच्या मैदानाचे आरक्षण रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले. कोट्यवधीची किंमत असलेल्या या जागेचा नगर परिषदेने मावेजा द्यावा किंवा सदर आरक्षण काढावे यासाठी जागामालक देवकीबाई जोगदंड या मागील २५ वर्षांपासून विविध पातळीवर लढा देत होत्या.बीड शहरातील गिराम तरफ भागातील १ हेक्टर ५२ आर या मोठया भूखंडावर नगरपरिषदेने विकास आराखडयात शाळा व खेळाचे मैदान असे आरक्षण टाकले होते. मात्र, ज्या शाळेसाठी हे आरक्षण टाकण्यात आले, त्या गुरूदत्त शिक्षण प्रसारक मंडळाने भांडवल नसल्याने जागा नको असल्याचे कळविले होते. त्यानंतर जागामालक देवकीबाई जोगदंड यांनी सदर जागा अनारक्षित करावी किंवा नगर परिषदेला हवी असेल तर बाजार भावाप्रमाणे अथवा भूसंपादन अधिनियमाप्रमाणे घ्यावी असा पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, नगरपरिषदेने जोगदंड यांना कसलाच मावेजा न देता सदर जागेचा ताबा घेतला होता. सदर जागेची भूसंपादन प्रक्रिया जिल्हाधिकारी यांचेकडून सुरू असल्याचे सांगत मावेजा द्यायला किंवा जागा अनारक्षित करायला नगर परिषदेने नकार दिला होता. जागा आरक्षित असल्याचे सांगत जागा मालकाला नगर परिषदेने बांधकाम परवानगीही नाकारली होती. प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून न्याय मिळत नसल्याने देवकीबाई जोगदंड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर जागा अनारक्षित करावी किंवा नगर परिषदेने बाजारभावासह विकत घ्यावी, आणि त्या रकमेवर ताबा कालावधीचे व्याज दयावे अशी मागणी केली होती.न्यायालयीन आदेशाने २५ वर्षांपासूनच्या प्रशासकीय व न्यायालयीन लढयाला यश येऊन पुर्णविराम मिळाला आहे.