शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुनर्वसूची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:39 IST

नांदेड: शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. गत दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिके तरारली असून शेतकरी आनंदी दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: मृग नक्षत्राच्या पावसावर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. उगवणही बऱ्यापैकी झाली मात्र परंतु तब्बल २० दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. गत दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिके तरारली असून शेतकरी आनंदी दिसून येत आहे.५ जुलै रोजी पुनर्वसू नक्षत्रास प्रारंभ झाला. नक्षत्राचे वाहन कोल्हा असल्यामुळे पाऊस पडेल की नाही म्हणून शेतकरी संभ्रमात होते. मात्र पुनर्वसू नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतीत पाणीच पाणी झाले. रविवारी रात्री जिल्हाभरात पावसाने जोरदार बॅटिंग केली़ त्यानंतर सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर संततधार सुरु होती़ कंधार, माहूर, अर्धापूर, नांदेड, नायगाव, भोकर आदी भागांत पावसाचा चांगला जोर होता़ दुपारी चार वाजेनंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती़ रात्री मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु होती़ शहरात महापालिकेने पावसाळापूर्व कामेच केली नसल्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसत आहे़ पावसामुळे शहरातील सर्व रस्ते जलयम झाले होते़ जुना मोंढा, लालवाडी, मगनपुरा, देगलूर नाका, लेबर कॉलनी इ. सखल भागांत नागरिकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरले होते़ त्याचबरोबर मुख्य चौक असलेल्या महावीर चौक, मोर चौक, भावसार चौक, श्रीनगर आदी भागात रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते़ त्यामुळे नांदेडकरांना चांगलीच कसरत करावी लागली़शेतीला मात्र या पावसाचा चांगला फायदा झाला असून सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, ज्वारी आदी पिके हातची जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली असताना हा पाऊस संजीवनीच ठरल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहेत. मात्र तरीही अजून मोठ्या पावसाची गरज आहे. सध्या सोयाबीन, मूग, उडीद ही पिके फुलोऱ्यात येण्याची वेळ असल्यामुळे या पिकांना हा पाऊस पोषक ठरणार आहे. मात्र कापूस व तूर ही दीर्घकालीन पिके असल्यामुळे त्यांना अजून पावसाची गरज आहे. ओढे-नाले खळाळले असले तरी जिल्ह्यातील एकाही नदीला मोठा पूर आला नाही.पुनर्वसू नक्षत्र दोन दिवसानंतर संपणार असून १९ जुलै रोजी पुष्य नक्षत्रास प्रारंभ होणार असल्याने या नक्षत्रातही दमदार पाऊस होईल, अशी आशा आहे़