शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कालव्यांची दुरुस्ती अडकली लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST

पाणी सोडण्याचा निर्णय झाला खरा; पण शेतकऱ्यांपर्यंत पाणीच जाणार नाही विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यातील बहुतांश कालवे गाळाने ...

पाणी सोडण्याचा निर्णय झाला खरा; पण शेतकऱ्यांपर्यंत पाणीच जाणार नाही

विकास राऊत

औरंगाबाद : जिल्ह्यातील बहुतांश कालवे गाळाने भरलेले असून, काही फुटलेले आहेत. त्यांची दुरुस्ती झाली नसल्यामुळे यंदाच्या रबी हंगामासाठी पाण्याची आर्वतने (पाणी सोडणे) मंजूर होऊन देखील शेतीपर्यंत पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमीच आहे. जिल्ह्यातील ११२ प्रकल्प, कालवे आणि धरणांच्या दुरुस्तीसाठी २४ ऑगस्ट रोजी पाहणी करून कडा कार्यालयाने ५५ कोटींचा सादर केलेला प्रस्ताव लालफितीत अडकला आहे.

कार्यकारी संचालक, मुख्य अभियंत्यांकडे याबाबत राजकीय नेत्यांनी देखील मागणी केली आहे. आता अर्धा डिसेंबर महिना लोटला आहे. चार महिन्यांपासून याबाबत काहीही निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्व कालवे नादुरुस्त असून, गाळाने भरलेले आहेत. १० वर्षांपासून दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे यंदा धरण व इतर प्रकल्पांमध्ये पाणी असतानादेखील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणे अवघड आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोट्यवधी रुपये दुरुस्तीसाठी दिले जातात. मराठवाड्यात ५० लाखांपेक्षा अधिक निधी दिला जात नाही. तसेच लोकसहभागातून कामे करावीत, अशा सूचना केल्या जातात. कालव्यांवर वर्ग- ३ वॉचमन नाहीत, चौकीदार, मोजणीदार नाहीत. कालवे फोडलेले आहेत. स्ट्रक्चर राहिलेले नाही. अशा परिस्थिती कालव्यांतून पाणी सोडण्याचा निर्णय जरी झाला असला तरी ते पाणी थेट शेतकऱ्यांना मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

१४३८ दलघमी पाणी देणार

यंदा औरंगाबादसह मराठवाड्यात १५० टक्के पाऊस झाल्याने सगळे प्रकल्प तुडुंब भरले. त्यामुळे आगामी रबी आणि खरीप हंगामात विभागातील जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या मोठ्या प्रकल्पांतून १४३८ दशलक्ष घनमीटर पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत गेल्या महिन्यात झाला आहे. जायकवाडीच्या दोन्ही कालव्यांवरील लाभ क्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी व अहमदनगर जिल्ह्यात आहे. डाव्या कालव्यातून रबी हंगामासाठी १ लाख २० हजार हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी १७० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यांवर १ लाख ४६ हजार ९०० हेक्टर व ५३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित करणे नियोजित आहे. त्यासाठी ११४८ दलघमी पाणी वापर अपेक्षित आहे.