शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसात अतिक्रमण हटाव

By admin | Updated: June 15, 2017 23:20 IST

वसमत : गुरुवारी तर भरपावसात पुन्हा कायम होवू पाहणाऱ्या अतिक्रमणांवर बुलडोजर चालविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : एकदा हटवलेली अतिक्रमणे पुन्हा बसू नयेत यासाठी तहसीलदारांनी यत्रंणा कार्यान्वित केली आहे. गुरुवारी तर भरपावसात पुन्हा कायम होवू पाहणाऱ्या अतिक्रमणांवर बुलडोजर चालविण्यात आले. तहसीलदारांच्या या धडाकेबाज कामगिरीला पोलीस निरीक्षकही दमदार साथ देत असल्याने शहर अतिक्रमणमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. वसमतच्या मुख्याधिकारीपदाचा प्रभार तहसीलदार उमाकांत पारधे यांच्याकडे आहे. त्यांनी पदभार घेतल्यापासून अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. मात्र नगरपालिकेने मोहिमेपुरते व फोटो काढण्यापुरते अतिक्रमण काढायचे आणि परत त्याच जागेवर अतिक्रमण करायचे अशी सवय लागलेली असल्याने, या मोहिमेतही अतिक्रमणधारक सज्ज आहेत. मात्र तहसीलदारांनी एकदा काढलेली अतिक्रमणे पुन्हा होवू नयेत यासाठी कायम बुलडोजर व पथक फिरते ठेवण्याची योजना सुरु केली आहे. त्यामुळे अतिक्रमणाला लगाम लागलेला आहे. काही जणांनी मुख्याधिकारीपदी प्रचंडराव येणार असल्याच्या बातम्या वाचून पुन्हा पहिल्या जागेवर अतिक्रमणे करणे सुरु केले होते. हे समजताच तहसीलदारांनी गुरुवारी भरपावसात अतिक्रमणांवर बुलडोजर चालवले. भरपावसात अतिक्रमण काढण्याची वसमतमध्ये ही पहिलीच वेळ आहे. या मोहिमेला पोनि उदयसिंग चंदेल हे स्वत: उभे राहून पोलीस संरक्षण देत असल्याने अतिक्रमणधारकांच्या हालचाली बंद झाल्या आहेत. ज्या ठिकाणावरुन अतिक्रमण काढले त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होऊ न देण्याचा निर्णय पारधी व चंदेल यांनी घेतला असून कुणाचीही गय केली जात नाही.