लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शहरात दुसऱ्या दिवशीही नगर पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. नाल्यांवरील बांधकामे व ओटे पाडून नाल्या मोकळ्या करण्याची कारवाई झाली. शहरातील सर्व अतिक्रमणे काढल्याशिवाय ही मोहीम थांबणार नाही, असा निर्धार तहसीलदार उमाकांत पारधी यांनी व्यक्त केलेला आहे. वसमत शहरातील गवळी मारोती मंदिर ते पोलिस ठाणे या रस्त्यावरील अतिक्रमणे पहिल्या दिवशी काढल्यानंतर आज पुन्हा ही मोहीम सुरू झाली. झेंडा चौक - मामा चौक या रस्त्यावरील दुकानांसमोरील नाल्यांवर झालेले अतिक्रमण काढून नाल्या मोकळ्या करण्यात आल्या. तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी उमाकांत पारधी यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. शहर अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार आहे. दोन दिवसात लहान-सहान अतिक्रमणे काढण्यात आली. बड्या अतिक्रमणांविरोधात कारवाई होणार की कसे याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव
By admin | Updated: June 8, 2017 23:51 IST