शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

रिमोटने वीज मीटरमध्ये केलेला फेरफार पडला २ लाखांत

By | Updated: November 28, 2020 04:07 IST

औरंगाबाद : पिठाच्या गिरणीसाठी वीज मीटरमध्ये रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध महावितरणने केलेल्या कारवाईत १७ हजार ८५६ युनिटची चोरी केल्याचे उघड ...

औरंगाबाद : पिठाच्या गिरणीसाठी वीज मीटरमध्ये रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध महावितरणने केलेल्या कारवाईत १७ हजार ८५६ युनिटची चोरी केल्याचे उघड झाले. महावितरणने गिरणीचालकाला १ लाख ९७ हजार ७४८ रुपयांचे अनुमानित बिल दिले आहे.

हडकोतील एक गिरणीचालक रिमोटद्वारे वीजचोरी करीत असल्याची तक्रार सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्याकडे आली होती. डॉ. गिते यांनी मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांना तक्रारीची शहानिशा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शहर-२ च्या पथकाने बुधवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास हडको एन-११ मधील शिकारे गिरणीची तपासणी केली. एन-१२ शाखेचे सहायक अभियंता मनीष अंभोरे व मीटर चाचणी कक्षाचे सहायक अभियंता विठ्ठल सपकाळ यांनी सुरुवातीला भेट दिली तेव्हा गिरणी बंद होती.

--

महिला अधिकाऱ्याने एक

किलो ज्वारी नेली दळायला

--

शहर-२ विभागाच्या कार्यकारी अभियंता निधी गौतम एक किलो ज्वारी घेऊन त्या गिरणीमध्ये ग्राहक बनून गेल्या. गिरणीचालक सुरेश पूनम शिकारे याने पिठाची गिरणी चालू करताच गौतम यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचित केले. जवळच असलेले सिडको उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल कराळे, गारखेडा उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय भंगाळे, सहायक अभियंता अंभोरे, सपकाळ, मुख्य तंत्रज्ञ रवींद्र गडप्पा, तंत्रज्ञ सोमाजी जाधव यांनी गिरणीवर धाड टाकली.

चोरीचे प्रात्यक्षिकही दिले

तपासणीत गिरणीच्या भिंतीवर अडकविलेल्या पिशवीत लपवलेले रिमोट सापडले. गिरणीचालकाने रिमोटने मीटरचा डिस्पले बंद करून वीजचोरी करीत असल्याची कबुली पथकाला दिली. त्याचे प्रात्यक्षिकही त्याने करून दाखवले. पथकाने रिमोट व मीटर जप्त केले. महावितरणच्या प्रयोगशाळेत मीटरची तपासणी केली असता या ग्राहकाने गेल्या दोन वर्षांत १७ हजार ८५६ युनिटची वीजचोरी केल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार ग्राहकाला १.९७ लाखांचे बिल देण्यात आले. विद्युत कायद्याच्या विविध कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली.