शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

नातेवाईकांनाच ओढावे लागते ‘स्ट्रेचर’

By admin | Updated: June 19, 2014 23:56 IST

उस्मानाबाद : समस्यांनी ग्रस्त असलेल्या येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात आता रूग्णांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढण्याची वेळ आली आहे़

उस्मानाबाद : समस्यांनी ग्रस्त असलेल्या येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात आता रूग्णांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढण्याची वेळ आली आहे़ ‘सेवक रूग्ण घेऊन गेले आहेत’ ही उत्तरे ऐकून नातेवाईक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी खासगी रूग्णालयात जाणे पसंत केल्याचे चित्र आहे़ विशेष म्हणजे रूग्णांसह नातेवाईकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे, यासाठी हजारो रूपये खर्च करून बसविण्यात आलेले वॉटर फिल्टर आजघडीला वापराबाहेर गेल्याचे दिसून येते.जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांसह नातेवाईकांना मिळणाऱ्या सेवा-सुविधांबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत़ समस्यांचे ‘माहेरघर’ बनलेल्या जिल्हा रूग्णालयात सध्या रूग्णांच्या नातेवाईकांवरच स्ट्रेचर ओढण्याची वेळ येत आहे़ सोनोग्राफी, सिटीस्कॅनसह इतर विविध तपासण्या असोत अथवा इतरत्र रूग्णाला नेण्याचे काम असो अनेकवेळा नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढावे लागत आहे़ जिल्हा रूग्णालयातील ट्रोमा वॉर्डात गुरूवारी दुपारी हा प्रकार पुन्हा एकदा दिसून आला़ बेंबळी येथील रूग्ण गणी शेख यांच्या पाठीला मार लागल्याने ते जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते़ मात्र, योग्य उपचार होत नसल्याने त्यांनी गुरूवारी दुपारी खासगी रूग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला़ रूग्ण तेथून बाहेर काढण्यासाठी सेवकच हजर नसल्याने त्यांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर स्वत: ओढत रूग्णास बाहेर आणावे लागले़ शिवाय खासगी टमटममध्ये त्यांनी रूग्ण नेल्यानंतर बाहेर थांबलेले ट्रेचर २५ ते २० मिनिट आहे त्याच जागेत पडून होते़ २० मिनिटानंतर आलेल्या सेवकाने ते स्ट्रेचर आत नेले़ तर आपल्या नातेवाईकासोबत आलेल्या समाधान कानाडे या शिराढोण येथील रूग्णाने एका रूग्णास तेथून स्वत: खुर्चीच्या स्ट्रेचरमधून नेले़ दुपारी जवळपास एक ते दीड तासाच्या कालावधीत अशा पध्दतीने अनेक रूग्णांच्या नातेवाईकांनीच स्ट्रेचर ओढत नेल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले़ हजारो रूपये खर्च करून ट्रोमा वॉर्ड व ओपीडी विभागात रूग्णांसह नातेवाईकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी बसविण्यात आलेल्या वॉटर फिल्टर यंत्रणाही काही दिवसांपासून बंद आहे़ बाहेर रिक्षा पॉर्इंटजवळ बनविण्यात आलेली टाकही कोरडीठाक पडली आहे़ केवळ एकाच टाकीत पिण्याचे पाणी असून, तेथी स्वच्छ आहे की नाही हा प्रश्न कायम आहे़ त्या टाकीच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात घाण साचत असून, त्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे़ (प्रतिनिधी)प्रकार थांबणार कधी ?स्वत:ची आई, भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा आदी नातेवाईक अजारी असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही काम करण्यास नातेवाईक तयार असतात़ मग स्ट्रेचर ओढण्यासाठी अनेकवेळा शिपाई नसला तरी ते स्वत: स्ट्रेचर ओढत नेतात़ मात्र, रूग्णास उचलून स्ट्रेचरवर ठेवताना घ्यावयाच्या काळजीचे ज्ञान नातेवाईकांना नसते़ त्यामुळे रूग्णास इतर प्रकारची इजा होऊ शकते़ अशा घटना टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सेवकांनाच स्ट्रेचर ओढण्याचे काम करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे़लिफ्टला मुहूर्त मिळेनाजिल्हा रूग्णालयातील गत अनेक महिन्यांपासून बंद असलेली फिफ्ट सुरू करण्याकडे संबंधित अधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे़ एकच लिफ्ट सुरू असून, अनेक रूग्णांना त्याचाही लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत़ बंद पडलेली फिफ्ट सुरू करण्याबाबत अनेक संघटनांनी तक्रारी, निवेदने दिली़ मात्र, त्या तक्रारी, निवेदनांनाही केवळ केराचीच टोपली मिळाली़ रूग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी बंद पडलेली लिफ्ट सुरू करावी, अशी मागणी होत आहे़