शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नियमित जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:04 IST

------------------------------------------------------ ८४५ ग्रॅम सोने परस्‍पर विक्री करणाऱ्याला जामीन नाकारला औरंगाबाद : दागिने बनविण्‍यासाठी दिलेल्या सोन्यापैकी ८४५ ग्रॅम सोने परस्‍पर ...

------------------------------------------------------

८४५ ग्रॅम सोने परस्‍पर विक्री करणाऱ्याला जामीन नाकारला

औरंगाबाद : दागिने बनविण्‍यासाठी दिलेल्या सोन्यापैकी ८४५ ग्रॅम सोने परस्‍पर विक्री करून, एलएमएस ज्वेलर्सची तब्बल ४० लाख १८ हजारांची फसवणूक करणारा कारागीर अमरचंद प्रेमराज सोनी याचा नियमित जामीन अर्ज मुख्‍य न्‍यायादंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी शनिवारी फेटाळला. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी काम पाहिले.

----------------------------------------------------------------------

५६ लाखांची फसवणूक करणाऱ्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला

औरंगाबाद : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीच्या गॅस एजन्सीचा परवाना आणि डीलरशिप देण्याचे जाहिरातीद्वारे आमिष दाखवून उद्योजकाची ५६ लाखांची फसवणूक करणारा मुख्‍य आरोपी नितीश कुमार जितेंद्र प्रसाद सिंग याचा नियमित जामीन अर्ज मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी शनिवारी फेटाळला. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी काम पाहिले.

---------------------------------------------------

२५ लाखांची फसवणूक करणाऱ्याला पोलीस कोठडी

औरंगाबाद : निजामाचा वंशज असल्याची थाप मारून, फळ संशोधन केंद्राची जमीन विक्री करून शिक्षकाची २५ लाखांची फसवणूक करणारा दिलशाद जहा ईमदाद जहा याला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी दिले. सहायक सरकारी वकील एन.ए. ताडेवाड यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

------------------------------------------------------------

मारहाणीच्या गुन्ह्यात तिघा आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारला

औरंगाबाद : प्रकरण न्‍यायप्रविष्‍ठ असलेल्या जमिनीच्‍या वादातून दोघा भावांना जातीवाचक शिवीगाळ करून, सळई व काठीने जबर मारहाण करून जखमी केल्याच्या गुन्ह्यात ज्ञानदेव अण्‍णासाहेब मुळे, सोपान नानासाहेब म्हस्‍के आणि जनार्दन बापू गिरगे यांनी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्‍यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी फेटाळला. सरकारतर्फे सहायक लोकाभियोक्ता मधुकर आहेर यांनी काम पाहिले.

------------------------------------------------------------------