शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

८८०० व्यापाºयांची जीएसटीनुसार नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:57 IST

भारत सरकारद्वारे एकच करप्रणाली वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करून या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना, जनजागृती केली जात आहे़ नांदेड विभागात पूर्वीचे ७००० करदाते आणि नव्याने १८०० करदात्यांनी नोंदणी केली आहे़ ग्रामीण तसेच सिमावर्ती भागात इंटरनेट व तांत्रिक बिघाडामुळे नोंदणीस विलंब होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भारत सरकारद्वारे एकच करप्रणाली वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करून या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना, जनजागृती केली जात आहे़ नांदेड विभागात पूर्वीचे ७००० करदाते आणि नव्याने १८०० करदात्यांनी नोंदणी केली आहे़ ग्रामीण तसेच सिमावर्ती भागात इंटरनेट व तांत्रिक बिघाडामुळे नोंदणीस विलंब होत आहे़१ जुलैपासून जीएसटीच्या संकेतस्थळावर व्यापाºयांकडून नोंदणी केली जात आहे़ नांदेड विभागाअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्याचा समावेश आहे़ आजपर्यंत या चार जिल्ह्यात दोन्ही विभागात मिळून १८०० व्यापाºयांनी नव्याने नोंदणी केली़ यापुर्वीचे व्हॅट भरणारे जवळपास सात हजार व्यापाºयांचे जीएसटी नोंदणीचे काम कार्यालयाने पूर्ण केले़ नव्याने नोंदणी केलेल्या व्यापाºयांमध्ये सर्वाधिक कापड व्यापारी, ट्रान्सपोर्ट, सर्व्हीस प्रोवायडर, साखर व्यापारी, फोटोग्राफर, सलून, पार्लर, ट्रॅव्हल्स आदींचा समावेश असल्याचे विक्रीकर अधिकारी माधव पुरी यांनी सांगितले़दरम्यान, जीएसटीसाठी व्यापाºयांना आॅनलाईन नोंदणी करून परवाना काढावा लागत आहे़ ग्रामीण भागात तसेच सीमावर्ती तेलंगना, आंध्रप्रदेशलगत असलेल्या जिल्ह्यातील भोकर, किनवट, बिलोली आदी तालुक्यातील ग्रामीण भागात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ परंतु, येणाºया अडचणी सोडविण्यासाठी वस्तू व सेवाकर कार्यालयातील यंत्रणा तत्पर आहे़त्याचबरोबर मुंबई कार्यालयातील अधिकाºयांची टीम नांदेडच्या बहुतांश व्यापाºयांना येणाºया अडचणीसाठी फोनद्वारे मार्गदर्शन करीत आहेत़नोंदणी करताना काही चुका झाल्या तर त्यासंदर्भात लगेचच संबंधी व्यापारी, दुकानदाराशी कार्यालयामार्फत संपर्क करून दुरूस्त करण्यास सांगितले जाते़ त्याचबरोबर ज्या व्यापाºयाकडे दोन पॅन कार्ड आहेत, आधार लिंक केलेले नाही अशा अडचणी सोडवून त्यांची नोंदणी करून दिली जात असल्याचे विक्रीकर अधिकारी पुरी यांनी सांगितले़