शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वीज मुबलक तरीही भारनियमन

By admin | Updated: May 29, 2014 01:14 IST

औरंगाबाद : मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध असूनही वीज बिल न भरणार्‍यांची संख्या वाढत असल्याने औरंगाबाद शहर वगळता उर्वरित जिल्ह्याच्या ८ तालुक्यांमध्ये महावितरण ६ ते ९ तासांपर्यंत भारनियमन करीत आहे.

 औरंगाबाद : मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध असूनही वीज बिल न भरणार्‍यांची संख्या वाढत असल्याने औरंगाबाद शहर वगळता उर्वरित जिल्ह्याच्या ८ तालुक्यांमध्ये महावितरण ६ ते ९ तासांपर्यंत भारनियमन करीत आहे. परिणामी, अख्खा जिल्हा अंधारात बुडाला आहे. ग्रामीण भागात सुमारे अडीच लाख ग्राहकांकडे वीज बिलापोटी ७१६ कोटी रुपये थकले आहेत. यामुळे महावितरणने ७९ फिडरवर भारनियमन करणे सुरू केले आहे. जिल्ह्यात दररोज ४९६ मेगावॅट विजेची आवश्यकता असून, यापेक्षा अधिक वीजपुरवठा करण्याची क्षमता महावितरणकडे आहे. वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ग्रामीण भागात जिथे ४२ ते ४५ टक्क्यांपेक्षा अधिक वीज गळती, वीज चोरी, थकबाकी आहे, अशा ठिकाणी भारनियमन करण्याचे निर्देश दिले आहेत. पैठण तालुक्यात पैठण गावठाण, ढोरकीन, बालानगर, डावरवाडी, पिंपरवाडी, बिडकीन, रांजणगाव, कडेठाण, ढाकेफळ, पाचोड. औरंगाबाद तालुक्यात चौका, पोखरी. फुलंब्री तालुक्यात वारेगाव, जातेगाव, सावंगी. गंगापूर तालुक्यात पिंपरखेडा, गणेशवाडी, तुर्काबाद, रांजणगाव, वरखेडा, काटेपिंपळगाव. वैजापूर तालुक्यात टिळक रोड, वैजापूर टाऊन. सोयगाव तालुक्यात बनोटी, वाकडी, देव्हारी, मुखेडा, सावळदबारा. खुलताबाद तालुका परिसरातील वेरूळ, कागजीपुरा, बाजारसावंगी, येसगाव, गदाना, सुलतानपूर, तेसगाव, गल्लेबोरगाव. कन्नड तालुक्यात कन्नड टाऊन, अंबागावठाण, कालिमठ गावठाण, कोलवाडी गावठाण. पिशोर परिसरातील अंभई, नागद, बेलखेडा, नाचनवेल, डोंगरगाव, वासडी, करंजखेडा आदी ७२ फिडरवर भारनियमन होत असल्याने या परिसरात कमीत कमी ६ ते ९ तासांपर्यंत भारनियमन केले जात आहे. शेतीसाठीच्या वीजपुरवठ्यात तर १३ ते १४ तासांपर्यंत भारनियमन होत आहे. यामुळे गावकर्‍यांना सायंकाळ कंदिल, मेणबत्तीच्या उजेडातच काढावी लागत आहे. दिवसभर उन्हाच्या कडाक्याने गावकरी हैराण होत आहेत. वीज गळती व थकित वीज बिलामुळे या गावांमध्ये भारनियमन केले जात आहे. मात्र, जे प्रामाणिकपणे वीज बिल भरतात असे ग्राहकही या भारनियमनात भरडले जात आहेत. औरंगाबाद शहर वगळता जिल्ह्यात २ लाख ३१ हजार १६४ वीज ग्राहक आहेत. यातील घरगुती विजेचा वापर करणार्‍या ५२ हजार ६८८ ग्राहकांकडे १५ कोटी २० लाख रुपये वीज बिलापोटीची रक्कम थकित आहे. २,७९० व्यावसायिक ग्राहकांकडे २ कोटी ३ लाख व ५३४ औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी ६३ लाख थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी शेतीसाठी वीज वापर करणार्‍या शेतकर्‍यांकडे आहे. १ लाख ७३ हजार ९५६ ग्राहकांकडे ६८१ कोटी ५८ लाख रुपये थकबाकी आहे. याशिवाय ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद, अशा पाणीपुरवठा करणार्‍या ९९६ कार्यालयांकडे १६ कोटी १५ लाख रुपये थकबाकी आहे. २७ फिडर भारनियमनमुक्त ज्या फिडरवर ४२ टक्क्यांपेक्षा अधिक वीज गळती व थकबाकी आहे अशा फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण भागातील ग्राहकही आता अधिकृत मीटर बसवून नियमित बिल भरू लागले आहेत. असे १७ फिडर आम्ही भारनियमनमुक्त केले आहेत. तसेच आणखी १० फिडरवरील भारनियमनमुक्तीचा प्रस्ताव पाठविला आहे. अशा ठिकाणी २४ तास वीजपुरवठा केला जात आहे. मागील वर्षभरात ८ हजारपेक्षा अधिक ठिकाणची वीजचोरी पकडण्यात आली असून साडेतीन हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. विजेची कमतरता नाही. जेवढी मागणी वाढेल तेवढा वीजपुरवठा करण्याची आम्ही क्षमता निर्माण केली आहे. मात्र, वीज गळती व थकबाकीमुळे फिडरनुसार भारनियमन करण्यात येत आहे. लोकांनी वीज बिल भरले तर भारनियमन होणार नाही. -शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण