औरंगाबाद : शहरातील अनधिकृत वसाहतींमध्ये (गुंठेवारी) विकासकामे होणार नाहीत, असे स्पष्टीकरण शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी आज सभागृहात दिले. काम होणार नसल्याचे उत्तर देऊन त्यांनी धन्यवाद मानून दिल्ली प्रस्थान करण्याच्या निमित्ताने सभागृह सोडले. शहर अभियंत्यांना खुलासा करण्यासाठी परत बोलवा, अशी ओरड सभागृहात सदस्यांनी घशाला कोरड पडेपर्यंत केली. मात्र ते काही परत आले नाहीत. ११८ गुंठेवारी वसाहती असून, ४० नगरसेवक त्या वसाहतींतून निवडून आले आहेत. एप्रिल २०१५ मध्ये मनपाच्या निवडणुका होणार आहेत. फेबु्रवारीपर्यंत विकासकामे पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांची धडपड सुरू आहे. प्रत्येक नगरसेवकाला जास्तीची कामे करून घेण्याची इच्छा आहे. परंतु आता ते शक्य नाही. कारण पालिकेच्या आर्थिक नाड्या थंडावल्या आहेत. २१० कोटी रुपयांचे उत्पन्न आजवर मिळाले आहे. आणखी २०० कोटी पालिकेला मिळण्याचा अंदाज आहे.महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी गुंठेवारी भागात सोयी-सुविधा देण्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र, मागील काही वर्षांत अशा सुविधा देण्यात सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा अपयशी ठरले आहेत. सुविधा देण्याची गुंठेवारी भागातील नागरिकांची आणि नगरसेवकांची मागणी होत असली तरी पालिकेला निधीअभावी त्या पुरविणे शक्य नाही.४राजू वैद्य म्हणाले, काही वॉर्डांत नवीन कामांची गरज आहे. नगरसेवक जहाँगीर खान हे संतापून टेबलवरच उभे राहिले. ते म्हणाले, माझ्या वॉर्डात एकही काम झालेले नाही. नासेर खान, खाजा शरफोद्दीन यांनी कब्रस्तानच्या सुरक्षा भिंतीची कामे करण्याची मागणी केली. ४राजू शिंदे म्हणाले, ५० टक्के स्लम, अनधिकृत वसाहतींमध्ये प्रशासनाने कामाचा कसा क्रम लावला आहे. मीर हिदायत अली, सूर्यकांत जायभाये, सविता सुरे, प्रीती तोतला, सविता घडमोडे, पुष्पा सलामपुरे, साधना सुरडकर, महेश माळवतकर, सत्यभामा शिंदे, प्राजक्ता भाले यांनी वॉर्डांतील कामे सुरू करण्याची मागणी केली.
गुंठेवारी वसाहतींमध्ये कामे करण्यास नकार
By admin | Updated: December 23, 2014 00:56 IST