शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

बी-बियाणांची पूर्तता करा

By admin | Updated: April 16, 2016 23:25 IST

बीड : खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांची मुबलक उपलब्धता शेतकऱ्यांना होईल याची दक्षता संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

बैठक : शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचनाबीड : खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांची मुबलक उपलब्धता शेतकऱ्यांना होईल याची दक्षता संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडीत, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, सीईओ नामदेव ननवरे, जिल्हा कृषी अधिक्षक रमेश भताने, कृषी उपसंचालक बी.एम. गायकवाड, महावितरणचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री मुंडे पुढे म्हणाल्या की, शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लागेल तेवढे बी-बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करा त्याअनुशंगाने त्याची मागणही करणे गरजेचे आहे. हंगामात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. बी-बियाणे, खतांचा काळाबाजार होणार नाही आणि त्यावर चोख नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके नेमण्यात यावीत. त्यामुळे काळाबाजार रोखून कार्यवाही केल्याने शेतकर्यांची गैरसोय होणार नाही.बी-बियाणाची मागणी करून त्याचा पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री मुंडे यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांना ३१ मे पुर्वी पिककर्ज उपलब्ध करु न देणे आवश्यक आहे. मजूरांच्या हाताला काम उपलब्ध करु न देण्यासाठी नरेगाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात कामे हाती घेण्यात यावे यामध्ये शोषखड्डे, पाणंद रस्ता या कामांना प्राधान्य द्यावे असेही पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हाधिकारी राम यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा सादर केला. खरीपासाठी ७० हजार ८९९ क्विंटल बियाणांची मागणी आहे. विविध प्रकारच्या रासायनिक खताची २ लाख ५३ हजार ७९० मे. टन रासायनिक खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. यावर्षी बँकामार्फत पिककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)सूचना : सर्व विभागांतील अधिकाऱ्यांची हजेरीखरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यांचा पुरवठा करून पीक कर्जाविषयीही योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. बी-बियाणे विक्रीमधून दरवर्षी गैरव्यवहार होतात. त्याअनुषंगाने भरारी पथकांच्या संख्येत वाढ करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यंदा खरिपाचे क्षेत्र वाढणार असून, कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांबरोबरच कडधान्यांचीही मोठ्या प्रमाणात लागवड होणार असल्याचे प्रास्ताविकात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.