शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच परवाना शुल्काची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:07 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसारच महापालिकेने व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. शुल्क वसुली आजपर्यंत का सुरू केली ...

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसारच महापालिकेने व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. शुल्क वसुली आजपर्यंत का सुरू केली नाही म्हणून वारंवार विचारणा होत आहे. यासंदर्भात लवकरच शहरातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन शुल्क वसुली सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

शहरातील व्यापाऱ्यांकडून परवाना शुल्क वसूल करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत. शासनाने आदेश दिल्यावरही पालिकेने सुमारे सात वर्ष परवाना शुल्क वसूल केले नाही. त्यामुळे नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाने आक्षेप घेतला. या आक्षेपानंतरही शुल्क वसुलीसाठी कारवाई केली नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या लोकलेखा समितीने याची गंभीर दखल घेतली. मागील महिन्यात समितीने महापालिकेला गंभीर स्वरूपात ताकीद दिली. महापालिकेने समितीसमोर १ एप्रिलपासून शुल्क वसुली करण्यात येईल असे आश्‍वासन दिलेले आहे. त्यामुळे महापालिकेने त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली. परंतु व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला.

व्यापाऱ्यांना शासनाकडे विविध कर भरावे लागतात. त्याशिवाय व्यापारी महापालिकेकडे मालमत्ता कर, पाणीपट्टी भरतात. त्यात पुन्हा परवाना शुल्काचा बोजा त्यांच्यावर कशासाठी असा सवाल व्यापाऱ्यांनी केला. त्यामुळे परवाना शुल्काचा मुद्दा वादात सापडला. दरम्यानच्या काळात पालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून शुल्क वसुलीची तयारी सुरू केली.

या प्रक्रियेबद्दल प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, परवाना शुल्क तर वसूल करावाच लागेल,त्यातून महापालिकेची किंवा व्यापाऱ्यांची मुक्तता होणार नाही. व्यापाऱ्यांशी चर्चा करुन, त्यांना विश्वासात घेऊनच परवाना शुल्काची वसुली केली जाईल. शुल्क वसुलीची कारवाई एकतर्फी केली जाणार नाही.