शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

दोषींकडून दोन कोटींची वसुली करा

By admin | Updated: January 17, 2016 00:03 IST

मुजीब देवणीकर, औरंगाबाद महापालिकेतील संपूर्ण कारभार संगणकावरच व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सहा वर्षांपूर्वी तब्बल दोन कोटी रुपयांचे ‘ईआरपी’ सॉफ्टवेअर खरेदी केले होते.

मुजीब देवणीकर, औरंगाबादमहापालिकेतील संपूर्ण कारभार संगणकावरच व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सहा वर्षांपूर्वी तब्बल दोन कोटी रुपयांचे ‘ईआरपी’ सॉफ्टवेअर खरेदी केले होते. मागील अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची ही यंत्रणा धूळ खात पडली आहे. ही यंत्रणा खरेदी करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांकडून दोन कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश राज्य शासनाने नुकतेच मनपाला दिले आहेत.राज्य शासनाच्या या आदेशामुळे मनपातील अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासाठी दोषी अधिकाऱ्यांकडून दोन कोटी रुपयांची वसुली करणे हे सुद्धा मोठे आव्हान ठरणार आहे. ‘ईआरपी’यंत्रणा मागील अनेक वर्षांपासून धूळ खात पडली आहे. मनपातील अधिकाऱ्यांच्या एका विशिष्ट लॉबीने ही यंत्रणा कशी हाणून पाडली यावर ‘लोकमत’ने वारंवार प्रकाश टाकला आहे. मागील वर्षी ‘लोकमत’च्या वृत्तावर ईआरपीसंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर राज्य शासनाने ईआरपी प्रकरण बरेच गांभीर्याने घेतले होते. २३ नोव्हेंबर २०१५ रोजी ईआरपी प्रणाली हाणून पाडणारी ‘लॉबी’या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. अलीकडेच राज्य शासनाने एक पत्र पाठवून ईआरपी प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांच्याकडून संबंधित दोन कोटींची रक्कम वसूल करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.अशी होती यंत्रणाईआरपी सॉफ्टवेअरअंतर्गत पहिल्या टप्प्यात आस्थापना, लेखा विभाग, मालमत्ता आणि तांत्रिक विभागांना एकमेकांशी जोडण्यात येईल. या विभागातील अधिकारी व कर्मचारी शंभर टक्केसंगणकावरच काम करतील. संगणकीय प्रक्रिया राबविण्यासाठी सॅप आणि सीएमसी या दोन मोठ्या कंपन्यांना काम देण्यात आले. चार कोटी रुपयांच्या या उपक्रमात तब्बल दोन कोटींचे सॉफ्टवेअर खरेदीसुद्धा करण्यात आले व कंपन्यांनी कामही सुरू केले.सॅप कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचे तर सीएमसी मनपाच्या गरजा पाहून सॉफ्टवेअरला आकार देण्याचे काम देण्यात आले होते.