शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी अल्लाहकडे साकडे

By admin | Updated: July 19, 2015 00:59 IST

लातूर : जिल्ह्यात रमजान ईद शनिवारी उत्साहात साजरी झाली़ शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९़३० वाजता नमाज पठण झाल्यानंतर मौलाना इस्माईल कास्मी

लातूर : जिल्ह्यात रमजान ईद शनिवारी उत्साहात साजरी झाली़ शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९़३० वाजता नमाज पठण झाल्यानंतर मौलाना इस्माईल कास्मी यांनी पाऊस पडावा, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबाव्यात़ देशाची व लातूर शहराची शांतता कायम राहवी, यासाठी दुवा मागितली़ सकाळी ९़३० ते १० वाजेपर्यंत बयान झाले़ त्यानंतर समाजबांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या़ वाहतुकीला अडथळा येवू नये म्हणून पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदलही केला होता़ आ़ अमित देशमुख यांच्यासह सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या़ मौलाना मुस्तफा मजाहिरी यांनी नमाज पठण केले़ यावेळी बयान करताना मौलाना इस्माईल कास्मी म्हणाले, जकात देणे ही चांगली बाब आहे़ प्रत्येकाने आपापल्या परीने जकात दिली पाहिजे, प्रत्येकाची ती बांधिलकी आहे़ सध्या पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़ त्यामुळे तो आत्महत्या करीत आहे़ या संकटातून बाहेर पडण्यासाठी देव मदत करेल़ देशात शांतता नांदावी, अशी प्रार्थना मौलाना ईस्माईल कास्मी यांनी केली़ यावेळी ईदगाह मैदानावर आ़विक्रम काळे, माजी आ़ वैजनाथ शिंदे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक डॉ़ ज्ञानेश्वर चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी वामन खरात, तहसीलदार संजय वारकड, महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, अ‍ॅड़ बी़व्ही़ मोतीपवळे, राजा मणियार, अ‍ॅड़ समद पटेल, अ‍ॅड़ आण्णाराव पाटील, बसवंतअप्पा उबाळे, शैलेश लाहोटी, नरेंद्र अग्रवाल, अ‍ॅड़ विक्रम हिप्परकर, मोईज शेख, चाँदपाशा घावटी, मोहन माने यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांचा प्रचंड मोठा जनसमुदाय होता़ नमाज अदा केल्यानंतर प्रत्येकाने पाऊस पडावा म्हणून दुवा मागितली़ बार्शी रस्त्यावर दयानंद महाविद्यालयासमोर ईदगाह मैदान असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बदलण्यात आली होती़ सकाळी ८ वाजल्यापासून या रस्त्यावरील वाहतूक समांतर रस्त्यावरुन वळविण्यात आली होती़ ११ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्यानेच झाली़ रमजान ईद या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देणे दिवसभर सुरु होते़ त्याचबरोबर गुलगुले, शिरखुर्मा, भजे, शंकरपाळे, चिवडा अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेत यंदाची ईद उत्साहात साजरी झाली़ नातेवाईक व इष्टमित्रांनीही या गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतला़ गळाभेट घेऊन ईदच्या एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जात होत्या़ शिवाय ईदगाह मैदानाच्या मुख्य रस्त्यावर शुभेच्छांचे फलकही लागले होते़ देशाचे वातावरण पोषक राहण्यासाठी सर्वांनी भाईचारा जपायला हवा़ त्यातूनच सर्व लोकांचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली़ पाऊस नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत़ पावसाअभावी शेतकरी संकटात आहेत़ या संकटातून बाहेर पडण्यासाठी देव मदत करेल, पाऊसही पडेल, अशी प्रार्थना यावेळी मौलाना ईस्माईल कास्मी यांनी केली़ यावेळी हजारो मुस्लिम बांधव व हिंदू बांधव प्रार्थनास्थळी उपस्थित होते़