शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास बसाल तर रेशनकार्ड रद्द!

By admin | Updated: February 7, 2017 22:25 IST

लातूर :उघड्यावर शौचास बसल्यास रेशनकार्ड रद्द करण्याचा बडगा उगारला जाईल, असा इशारा त्यांना दिला जात आहे़

लातूर : ज्यांना जागा नाही त्यांना सार्वजनिक शौचालय व ज्यांना जागा आहे त्यांना शौचालय बांधून देण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोहीम राबविण्यात येत आहे़ या योजनेत सहा हजार लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले. तरीही काही भागांमध्ये लोक उघड्यावर शौचास जातात़ त्याविरूद्ध जनजागृती मोहीम मनपाने सुरू केली असून, उघड्यावर शौचास बसल्यास रेशनकार्ड रद्द करण्याचा बडगा उगारला जाईल, असा इशारा त्यांना दिला जात आहे़स्वच्छ अभियानांतर्गत घरोघरी शौचालयाची सक्ती केली जात असतानाच उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण अद्याप शहरासारख्या भागातही आहे़ शिवाय, शौचालय बांधून देण्याची योजनाही राबविण्यात येत आहे़ लातूर शहरात सहा हजार लाभार्थ्यांना शौचालयासाठी अनुदान देण्यात आले़ यातील तीन हजार लाभार्थ्यांचे शौचालय बांधकाम पूर्ण झाले असून, दोन हजार लाभार्थ्यांचे प्रगतीपथावर आहे़ एक हजार लाभार्थ्यांनी १५ दिवसात शौचालय बांधकाम पूर्ण करण्याचे लेखी दिले आहे़ तरीही शहरातील रिंगरोडलगतच्या वस्त्यांमध्ये उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण आहे़ या वस्त्यांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून दररोज सकाळी ५़३० ते ९़०० वाजपेर्यंत गुडमॉर्निंग पथक नजर ठेवून आहे़ जे नागरिक उघड्यावर शौचास जातात त्यांना या अभियानांतर्गत समज दिली जात आहे़ काही नागरिकांना तर दिवसभर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते़ आता त्यांनी सार्वजनिक शौचालयाचा वापर सुरू केला असला तरी त्यांच्याकडे शौचालय नाही, त्यांना अनुदान देण्यासाठी मनपाने प्रस्तावही तयार केले आहेत़ उघड्यावर शौचास गेल्याचे निदर्शनास आल्यास शासनाच्या निर्देशानुसार त्यांचे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र जप्त करून रद्द करण्याची कारवाई करण्यासाठी मनपाने तयारी केली आहे़ प्रारंभी त्यांना समजून सांगण्यासाठी गुडमॉर्निंग पथकाची जनजागृती शहरातील चारीही झोनमध्ये झोनप्रमुखांमार्फत सुरू असल्याचे मनपाचे आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले़