शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

By admin | Updated: September 11, 2014 01:21 IST

औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूची साथ जोरात सुरू आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत दहा जणांचे बळी गेले आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूची साथ जोरात सुरू आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत दहा जणांचे बळी गेले आहेत. डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण प्रत्येक गल्लीबोळात दिसत असल्याने शहरातील सर्व खाजगी रुग्णालये आणि आयसीयू डेंग्यूच्या रुग्णांनी फुल झाले आहेत. घाटी रुग्णालयातही दाखल होणाऱ्या डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे. तीन महिन्यांत घाटीत दाखल झालेल्या ५४७ रुग्णांपैैकी १४८ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे अहवालात समोर आले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश मगरे यांनी सांगितले की, डेंग्यूसदृश रुग्णांची रोज नव्याने भर पडत आहे. मे महिन्यात ६३ डेंग्यूसदृश रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी ७ जणांना डेंग्यू झाल्याचे समोर आले होते. जूनमध्ये ५८ रुग्ण घाटीत दाखल झाले होते. त्यापैकी १८ रुग्णांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला होता. जुलै महिन्यात रुग्णांची संख्या दुप्पट १०५पर्यंत वाढली. या रुग्णांची रक्ततपासणी केली असता ३१ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर आॅगस्टमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे २५४ रुग्ण घाटीत दाखल झाले. यापैकी ९१ जणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. डेंग्यूच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने महानगरपालिका आणि ग्रामीण आरोग्य विभाग यांच्याकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे यावरून पुन्हा सिद्ध होते.थंडी-ताप आल्यानंतर रुग्णाला तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जावे. त्याच्या रक्ताची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला डॉ. मगरे यांनी दिला.