शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांची तीव्र निदर्शने

By admin | Updated: January 23, 2017 23:42 IST

जालना : महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करीत महसूल कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

जालना : महसूल कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करीत महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, महसूल विभागाने २० जानेवारी रोजी रात्री वाळूची अवैध वाहतूक करणारा एमएच २०/ सीटी असा अर्धवट क्रमांक असलेला ट्रक ताब्यात घेऊन तो तहसील कार्यालयात जमा केला होता. परंतु, या ट्रकशी संबंधित असलेल्या सहाजणांनी २१ जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तहसील कार्यालयात येवून येथील कोतवाल सोमनाथ गणेश सरफळे व विश्वंभर किसनराव केदार यांना शिवीगाळ करून तसेच धमकी देवून हा ट्रक पळवून नेला. त्यामुळे याबाबत याच दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास अंबड पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल करण्यात आली.दरम्यान, या फिर्यादीच्या अनुषंगाने २२ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तपास अधिकारी पोउपनि विजय जाधव यांनी केदार यांना दूरध्वनी करून पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यामुळे संबंधित दोन्ही कोतवाल पोलिस ठाण्यात पोहोंचले. यावेळी जाधव व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांनी या दोन्ही कोतवालांना खोटी फिर्याद देता का, अशी विचारणा करीत फिर्यादीमध्ये बेकायदेशीर बदल करण्यास सांगितले. परंतु, कोतवालांनी यास नकार दिल्यामुळे जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी दमदाटी तसेच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. सोमनाथ सरफळे यांनी शिवीगाळीचा जाब विचारला असताना जाधव त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही कोतवालांना लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. सरफळे यांना बेकायदेशिररित्या कोठडीमध्ये डांबून मारहाण करण्यात आली; तर जाधव यांनी त्यास स्वत:च्या पाया पडण्यास भाग पाडले. तसेच तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आयुष्य बरबाद करेन, अशी धमकीही दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. यानंतर या घटनेबाबत पोउपनि विजय जाधव यांच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी अंबड तहसीलदारांसोबत हे कोतवाल अंबर पोलिस ठाण्यात गेले असता तेथेही पोनि रामेश्वर खनाळ यांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिल्याचा आरोप निवेदनात केला आहे.याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकारी विजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अन्यथा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना तसेच तलाठी संघ, महसूल कर्मचारी संघटना आणि कोतवाल कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.या आंदोलनात जालन्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी, अंबड, घनसावंगी येथील तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, कोतवाल संघाचे पदाधिकारी आदी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)