शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन’मधील प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:11 IST

सात वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या प्रेयसीने माजी सैनिक प्रियकराविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सात वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या प्रेयसीने माजी सैनिक प्रियकराविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले.लहू कडाजी नाटकर (३३, रा. जालना) असे आरोपीचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पीडिता आणि आरोपी यांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. आरोपीने पीडितेला पुंडलिकनगर परिसरात घर भाड्याने घेऊन दिले आणि तेथे ते सात वर्षांपासून राहत. या काळात त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यामुळे पीडिता आज पाच महिन्यांची गर्भवती आहे. यामुळे पीडितेने त्यास लग्नासाठी सतत आग्रह धरला. सुरुवातीला त्याने तिला आज करू, उद्या करू, असे सांगून वेळ मारून नेली. मात्र, बाळाच्या जन्मापूर्वी आपला विवाह होणे आवश्यक असल्याचे पीडितेने त्यास सांगताच आरोपीने लग्न करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. शिवाय यापुढे लग्नाचा विषय काढायचा नाही, असे म्हणून तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. प्रियकराने आपला विश्वासघात करीत अत्याचार केल्याची तक्रार तिने शनिवारी थेट पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड तपास करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी सांगितले. पीडिता ही येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करते. तो जालना येथून रोज ये-जा करून तिच्यासोबत राहत होता.