शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

रणवीर सिंगचा अतरंगी अवतार व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:02 IST

- रणवीर सिंग बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक हिरो आहे, यात वाद नाही. मात्र त्याची अंतरंगी स्टाईल म्हणजे, कळस आहे. होय, ...

- रणवीर सिंग बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक हिरो आहे, यात वाद नाही. मात्र त्याची अंतरंगी स्टाईल म्हणजे, कळस आहे. होय, आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे, स्टाईलमुळे रणवीर सतत चर्चेत असतो. सध्याही रणवीरचा असाच एक अतरंगी लूक चर्चेत आहे. नुकताच रणवीर काम संपवून एका ठिकाणावरून बाहेर पडला. पण त्याचा लूक असा की, कोणीच त्याला ओळखू शकले नाही. रणवीरने यावेळी एक डिझाईनर मास्क घातला होता. ब्लॅक कलरचा हा डिझाईनर मास्क, सोबत निळ्या रंगाचा गॉगल आणि निळ्याच रंगाचा हुडी ट्रॅकसूट असा त्याचा अवतार होता. रणवीर अनेकदा अशा अतरंगी अवतारात दिसतो. यावरून अनेकदा तो ट्रोलही होतो. पण रणवीरने कधीच याची पर्वा केली नाही.

वरुण धवन याच महिन्यात अडकणार लग्नबेडीत ?

अभिनेता वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. वरुण आणि नताशा बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. वरुणने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला नताशासोबतचे रिलेशन जाहीर केले नव्हते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांचे लग्न लांबले होते. मात्र हे दोघे आता याच महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. वरुण आणि नताशा अलिबागमध्ये लग्न करणार असल्याचं कळतंय. तो नुकताच पंचतारांकित हॉटेल बुक करण्यासाठी अलिबागला गेला होता. हे एक ग्रँड पंजाबी लग्न असेल. परंतु कोरोना व्हायरसमुळे या लग्नात फक्त जवळचे लोक उपस्थित असणार आहे. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी २०० लोकांची यादी तयार केली असल्याची माहिती आहे.

साडी नेसून अदा शर्माची कार्टव्हील उडी

अभिनेत्री अदा शर्मा तिच्या फिटनेसकडे कटाक्षाने लक्ष देत असल्याचं दिसून येतं. अदा एका शॉर्ट फिल्म आणि तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर अदाच्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये तिने चक्क साडी नेसून कार्टव्हील उडी मारली आहे. अदाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती एका समुद्र किनाऱ्यावर उभी आहे. तिने गुलाबी रंगाची साडी नेसली असून काही वेळाने ती लयबद्ध कार्टव्हील उडी मारत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, साडीमध्ये अशी उडी मारणे अत्यंत कठीण मानले जाते. मात्र, अदाने सहजरित्या हे केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा रंगली आहे.