शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पैसे भरून वाहनांची सुरक्षा रामभरोसे

By admin | Updated: September 30, 2014 01:30 IST

औरंगाबाद : नवरात्रोत्सवामधील मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून कर्णपुरा यात्रेची ख्याती आहे. येथे रोज लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.

औरंगाबाद : नवरात्रोत्सवामधील मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून कर्णपुरा यात्रेची ख्याती आहे. येथे रोज लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. येथे भाविकांकडून पार्किंगचे पैसे घेऊन तुमच्या वाहनाची जबाबदारी आमची नाही, असे स्पष्ट सांगितले जात आहे. यामुळे पैसे भरूनही वाहनांची सुरक्षा रामभरोसे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.छावणी परिषदेने यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची व्यवस्था आणि सुरक्षेसाठी पार्किंगचे टेंडर काढले होते. यात्रेच्या वेळेत पार्किंग चालविण्याचे टेंडर ४ लाख ९८ हजार रुपयांत गेले आहे. या अधिकृत पार्किंगमध्ये दुचाकीसाठी १० रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी २० रुपये आकारले जात आहेत; पण पार्किंगमध्ये वाहन लावल्यानंतर प्रत्येक वाहनधारकांना पार्किंगची पावती देण्यात येत नाही. वाहन घेऊन जाताना पार्किंगचे पैसे घेतले जातात. विशेष म्हणजे पार्किंगमध्ये वाहन लावल्यानंतर देण्यात येणाऱ्या पावतीवर गाडीचे नुकसान झाल्यास पार्किंग जबाबदार नाही, ही सूचना असल्यामुळे पार्किंगचे पैसे भरूनही फायदा नाही. वाहनाच्या सुरक्षेची जबाबदारी टेंडरधारकाची नाही, तर पैसे घेता कशाचे असा प्रश्न वाहनधारक करीत आहेत. यात्रेच्या परिसरात तीन पार्किंग असून, दोन पार्किंगमध्ये दुचाकीसाठी १० रुपये, चारचाकीसाठी २० रुपये आकारले जातात. एका पार्किंगमध्ये दुचाकीसाठी २० रुपये, तर तीन आणि चारचाकीसाठी चक्क ५० रुपये पार्किंग आकारली जात आहे.