बीड: २६ जुलै हा आरक्षण दिन आहे. यानिमित्ताने शनिवारी बहुजन समाज पार्टीच्या वतीने बीड शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.छत्रपती शाहू महाराजांनी क्रांतीकारक पाऊल उचलत शोषीत समाजाला सरकारी नौकरीत ५० टक्के आरक्षण देऊन दुर्लक्षीत घटकाला शैक्षणिक, आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. या निमित्ताने २६ जुलै हा दिवस आरक्षण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने बीड येथे बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीला सुरूवात झाली. रॅलीनंतर मार्गदर्शन करताना बसपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप उघडे म्हणाले की, इतर मागासवर्ग दलित, ओबीसी जनजातीसाठी आरक्षणाची व्यवस्था केली. यामुळे शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या समाजाला शिक्षण घेता आले. शिक्षण आणि न्याय सामाजिक क्रांतीचे दोन पैलू आहेत. शाहू महाराजांनी शिक्षण व नोकरीत आरक्षणाची तरतूद करून ऐतिहासिक निर्णय घेतला. बहुजन समाजाला आरक्षणामुळे न्याय मिळाला. हा न्याय देण्याचे काम शाहू महाराजांनी केले आहे. विविध जातींमध्ये समानतेच्या आधारावर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत इतर मागासवर्गीयांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळू शकत नाही, असे मत यावेळी उघडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील जिल्हा महासचिव संजय मिसाळ, अॅड. चंदनशिवे, सतीश गवारे, मधुकर ठोकळ, सौरभ कांबळे, सुरज गायकवाड, धिरज वडमारे, सचिन खामकर, अक्षय लोंढे, लखन गायकवाड, मुरलीधर वडमारे, शाम मुजमुले, बाळासाहेब गायकवाड, दिगांबर पवळे, दादा कांबळे, सोमनाथ मोरे आदींसह अनेक प्रति$ि$िष्ठीत नागरिकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने शहर दणाणले बहुजन समाज पार्टीच्यावतीने मोटारसायकल रॅली काढली.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील कार्यकर्त्यांची रॅलीला होती उपस्थिती.रॅलीनंतर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यामध्ये तालुक्यात आलेल्या कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीला झाला प्रारंभ.
आरक्षण दिनानिमित्त रॅली
By admin | Updated: July 27, 2014 01:10 IST