शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे नवीन रणनितीसह भरणार पक्षात ‘जान’

By admin | Updated: November 18, 2014 01:08 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच नऊ मतदारसंघांत पराभव पत्करावा लागल्यामुळे नैराश्य आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाशी बांधून ठेवण्याच्या दृष्टीने,

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच नऊ मतदारसंघांत पराभव पत्करावा लागल्यामुळे नैराश्य आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाशी बांधून ठेवण्याच्या दृष्टीने, तसेच महापालिकेच्या २०१५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने पक्षामध्ये ‘जान’ भरण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे महिनाअखेरीस शहरात चार दिवस तळ ठोकणार आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या २५ ते २८ या तारखांदरम्यान राज ठाकरे शहरात मुक्कामी राहणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षामध्ये तशी सामसूम आहे. राज ठाकरे यांचा दौरा आधी ९ तारखेला होणार होता; मात्र मुलीच्या अपघातामुळे हा दौरा लांबणीवर पडला. आता हा दौरा नोव्हेंबरअखेरीस होत आहे. चार दिवसांच्या या दौऱ्यात राज ठाकरे हे पक्षाच्या शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनाही भेटणार आहेत. आगामी महापालिकेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगण्यात आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी अजिबात समाधानकारक राहिली नाही. २००९ मधील विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या रूपाने जिल्ह्यात एक आमदार निवडून आला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्यांचे आठ सदस्य निवडून आले. यामुळे पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी अतिशय खराब राहिल्याने कार्यकर्त्यांमध्येही नैराश्येचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेला पुन्हा उभारी देण्यासाठी ठाकरे चार दिवस शहरात थांबणार आहेत. मनपाची तयारी२०१० मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचा एकच नगरसेवक निवडून आला. ५३ वॉर्डांत मनसेने उमेदवार उभे केले होते; मात्र राज वानखेडे यांच्या रूपाने एक नगरसेवक महापालिकेत जाऊ शकला. १८ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. या आशेवर आता महापालिकेत स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात येणार आहे. मागील महापालिका निवडणुकीत पक्षाने पहिल्यांदाच मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले होते; मात्र निवडणुकीचा कार्यकर्त्यांना फारसा अनुभव नसल्याने अपयश आले. मागच्या महापालिकेचा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव कार्यकर्त्यांना असून पक्षाला महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे, असे मत पक्षाचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी व्यक्त केले. आता राज ठाकरे यांच्या दौऱ्यात काय रणनीती आखली जाते याकडे कार्यकर्त्यांसह भाजपा आणि शिवसेनेचेही लक्ष असणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत शिवाजी पार्कवरील आदरांजली कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सुमारे दहा मिनिटे एकमेकांशी गप्पा मारल्या. यामुळे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची लहर आहे.हे दोन्ही नेते भविष्यात एकत्र आल्यास त्यांचे स्वागतच आहे, अशा प्रतिक्रिया मनसेच्या गोटातून व्यक्त होत आहेत. मात्र, शिवसेनेइतकेच पदाधिकारी मनसेमध्येही काम करीत असल्याने पक्षीय पातळीवर याचाही विचार करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.२००९ मध्ये राज्यात १३ आमदार निवडून आल्यामुळे पक्षामध्ये उत्साहाचे वारे होते. पक्षाची घसरलेली कामगिरी पाहता पक्षामध्ये ‘जान’ भरण्याचे मोठे काम राज ठाकरे यांना करावे लागणार आहे. त्यामुळेच त्यांनी औरंगाबादसाठी चार दिवसांचा वेळ दिला आहे. शहरात मागील तीन-चार वर्षांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या विविध मुद्यांवर आंदोलने करून आवाज उठविला. मात्र, तरीही पक्षाला यश मिळालेले नाही.