औरंगाबाद : सिल्लोड शहरासह तालुक्यात बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. आमठाणा, उंडणगाव परिसरातही सायंकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे बळीराजा सुखावला आहे.सिल्लोड शहरासह तालुक्यात बुधवारी (दि.२२) दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. गत चार दिवसांपूर्वी झालेल्या अल्प पावसाच्या बळावर परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला होता. बुधवारी झालेल्या पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे.बुधवारी दुपारी ३ वाजता पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसत होता. जोरदार पावसामुळे परिसरातील बळीराजा आता जोमाने पेरणीला लागणार आहे.
सिल्लोड, कन्नड, वैजापूरमध्ये पाऊस
By admin | Updated: June 23, 2016 01:31 IST