शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्टेशन रामभरोसे

By admin | Updated: May 24, 2016 01:26 IST

संतोष हिरेमठ , औरंगाबाद ऐतिहासिक औरंगाबाद आधीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवरील शहर आहे. अशा परिस्थितीत औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनवर रविवारी रात्री स्फोटासाठी

संतोष हिरेमठ , औरंगाबादऐतिहासिक औरंगाबाद आधीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवरील शहर आहे. अशा परिस्थितीत औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनवर रविवारी रात्री स्फोटासाठी वापरण्यात येणारे डिटोनेटर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. परंतु या घटनेनंतरही रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उदासीन आहे. कोणत्याही तपासणीशिवाय काहीही रेल्वेस्टेशनमधून बिनधास्त नेता येते. रेल्वेस्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून दिसून आले आहे.देशभरातील मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा समावेश आहे. पर्यटनाची राजधानी असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक, प्रवाशांची ये-जा सुरू असते. नोकरी, व्यवसायानिमित्त रोज अप-डाऊन करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. सध्या उन्हाळी सुट्या असल्यामुळे रेल्वेगाड्या प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून जात आहेत. रेल्वेस्टेशनवर पाय ठेवायलाही जागा नाही. रेल्वेस्टेशनवरून दररोज २५ हजारांवर प्रवासी ये-जा करतात. रेल्वेस्टेशनवर प्रवाशांची कायम गर्दी असताना त्यांचा प्रवास सुरक्षित होईल, याकडे मात्र रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत आहे. ‘रेल्वे प्रवासादरम्यान ज्वालाग्रही पदार्थ नेऊ नये’ अशी सूचना केली जाते; परंतु केवळ सूचना देऊन रेल्वे प्रशासन मोकळे होत आहे. धोकादायक वस्तूंची रेल्वेस्टेशनवर आणि रेल्वेगाड्यांमधून वाहतूक होणार नाही, यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही. त्यामुळे रेल्वेस्टेशनची सुरक्षा व्यवस्था तोडकी असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून दिसून आले आहे.मेटल डिटेक्टर टाळून ये-जानव्या इमारतीत मेटल डिटेक्टर असूनही प्रवासी त्यातूनच जाईल, अशी कोणतीही व्यवस्था नाही. मेटल डिटेक्टर लावण्यात आल्यानंतर उर्वरित भाग बंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी याठिकाणी (पान २ वर)औरंगाबाद : अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या औरंगाबाद शहरातील मुख्य रेल्वेस्टेशनवर रविवारी स्फोटके आढळले होते. या घटनेने संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरली आहे. शहर पोलिसांसोबतच, दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस), गुप्तवार्ता विभागाकडून (एसआयडी) या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे. या घटनेला २४ तास उलट्यानंतरही याप्रकरणी कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाही.अत्यंत संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादेतील रेल्वेस्टेशनवर रविवारी रात्री एका भीक मागणाऱ्या दहावर्षीय बालकाकडे एक डिटोनेटर आढळले (पान २ वर)शहर आणि ग्रामीण भागात परवानाधारक स्फोटकांचे विक्रेते आहेत. विहीर, खदान खोदण्यासाठी डिटोनेटर्स, जिलेटिनचा वापर केला जातो. परवानाधारकांनाच अशी स्फोटके हाताळण्यास आणि बाळगण्यास परवानगी आहे. शिवाय स्फोटकांची ने-आण रेल्वे, एस.टी.बसमधून करता येत नाही, असे असताना रेल्वेस्टेशनवर आढळलेल्या स्फोटकांमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे परवानाधारकांनी कोणा-कोणाला स्फोटकांची विक्री केली, याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, रेल्वेस्टेशनवर आढळलेल्या स्फोटकांची माहिती आम्ही एटीएस आणि ग्रामीण पोलीस विभाग यांना दिलेली आहे. शहर आणि ग्रामीण भागात स्फोटके बाळगणारे परवानाधारक लोक आहे. त्यांचीही चौकशी केली जात आहेत. या घटनेत प्रथमदर्शनी घातपाताचा प्रकार वाटत नसला तरी आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही.