जालना : रबी हंगामातील ज्या गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे अथवा त्या पेक्षा कमी आलेली आहे ती गावे सन २०१४ - २०१५ मध्ये टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.जिल्हाधिकारी रंगानायक यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. रबी पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आलेल्या बदनापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. बदनापूर, पाडळी, रामखेडा, लक्ष्मणनगर तांडा, लक्ष्मणनगर, अकोला, सोमठाणा, निकळक, वाल्हा, पीरवाडी, डोंगरगाव, राजेवाडी, धनगरवाडी, रोषणगाव, कुसळी, वाकुळणी, देवगाव, अंबडगाव, धोपटेश्वर, कस्तुरवाडी, बाजारवाहेगाव, नाणेगाव, सायगाव, मांजरगाव, डोंगरगाव आदी गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. जिल्ह्यातील सन २०१४-१५च्या रबी हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सुट, इयत्ता दहावी व बारावी परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर,टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीत पंपाची वीजजोडणी खंडित न करणे इत्यादी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
रबी हंगामातील ४० गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर
By admin | Updated: March 19, 2015 23:54 IST