शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शंभर स्वच्छतागृह सुरू करण्याचा प्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांसह नागरिकांची ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांसह नागरिकांची मोठी कुचंबणा होते. ही बाब लक्षात घेऊन १०० ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू करण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी फेब्रुवारी महिन्यात अधिकाऱ्यांना दिले. प्लास्टिकचे शौचालय खरेदी करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच या ठिकाणी प्लास्टिकची शौचालये उभारण्यात येणार आहेत.

५० स्वच्छतागृह महिलांसाठी, तर ५० पुरुषांसाठी असतील, असे जाहीर करण्यात आले होते. या कामात महापालिकेकडून अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी, सराफा, शहागंज, निराला बाजार येथे सार्वजनिक स्वच्छतागृह असले तरी यातील काही स्वच्छतागृहांची पडझड झाली आहे. काही स्वच्छतागृह देखभाल दुरुस्तीअभावी बंद आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी याविषयी वारंवार आवाज उठवला होता. सुलभ तसेच शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची वारंवार घोषणाही झाली. मात्र, अद्याप बोटावर मोजण्याएवढीच स्वच्छतागृह शहरात आहेत. त्यामुळे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरात १०० ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फायबरपासून तयार केलेली ही स्वच्छतागृह असतील. त्यामुळे जागा कमी लागणार असून, किंमतही कमी असेल. ५० महिलांसाठी, तर ५० पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भात अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटले तरी या कामात प्रशासनाकडून कोणतीही प्रगती दिसून येत नाही. या कामासाठी स्मार्ट सिटी योजनेतून निधी घेण्याचे निश्चित झाले होते.

चौकट...

शासनाच्या पोर्टलवरून खरेदी

फायबरची बनविलेली शौचालये खरेदी करण्यासाठी शासनाच्या पोर्टलवरून निविदा मागविण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया अंतिम करून शहरात शौचालय उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी जागासुद्धा निश्चित करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली.