शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

मुलांच्या ताब्यावरून न्यायालयाच्या आवारात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:00 IST

मुलांच्या अंगावरील दागिने गायब असल्याच्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाला आणि न्यायालयाच्या आवारात हाणामारी सुरू झाली

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : न्यायालयाने नोटीस दिल्यानंतर मुलांचा ताबा घेण्यासाठी आई माहेराकडील नातेवाइकांसह न्यायालयात आली. वडीलही मुलांना घेऊन न्यायालयात पोहोचले. आईला मुलांचा रीतसर ताबाही मिळाला. मात्र, मुलांच्या अंगावरील दागिने गायब असल्याच्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाला आणि न्यायालयाच्या आवारात हाणामारी सुरू झाली. येथील न्यायालयाच्या आवारात गुुरुवारी दुपारी हा प्रकार घडला.परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील वडी येथील प्रवीण बाबूराव कुºहाडे यांचा पत्नी कल्पना यांच्यासोबत कौटुंबिक वाद आहे. या दाम्पत्याची तिन्ही मुले रोहन (४), पूनम (३) व पायल (७ महिने) वडील प्रवीण हिवाळे यांच्याकडे राहत होती. मुलांचा ताबा आपणास देण्यात यावा यासाठी कल्पना यांनी परतूर न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने मुलांना आईच्या ताब्यात देण्याची नोटीस प्रवीण हिवाळे यांना दिली. त्यानुसार हिवाळे गुरुवारी नातेवाईकांसह तिन्ही मुलांना घेऊन परतूर न्यायालयात आले. मुलांना आईच्या ताब्यात देण्यात आले. या वेळी मुलांच्या गळ्यातील सोन्याचा ‘ओम’, कानातील दागिने, चांदीचे वाळे गायब असल्याने कल्पना यांनी पतीकडे दागिन्याची मागणी केली. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये न्यायालयाच्या आवारातच हाणामारी सुरू झाली. त्यामुळे गोंधळ उडाला. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटविण्यात आले. वडीहून आलेला मुलांचा पिता व सोबतच्यांना पोलीस बंदोबस्तात गावी नेऊन सोडण्यात आले. चार वर्षाचा रोहन वडिलांकडे जायचे म्हणून रडत होता, तर त्याच्या दोन्ही बहिणी निरागसपणे घडत असलेला सर्व प्रकार पाहत होत्या. मुलांची आई कल्पना यांच्याकडून अ‍ॅड. झेड. एन. कादरी यांनी काम पाहिले.