लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात गत काही वर्षांपासून माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने तसेच रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब व नत्राच्या प्रमाणात घट आली आहे. शेती जनिमीची सुपिकता दिवसेंदिवस खालावत असल्याचे चित्र आहे. सरासरी निर्देशांक १ असावा मात्र मृद चाचणीवरून हा निर्देशांक ०.७१ एवढा असल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण सुपिकता पातळी अत्यंत कमी असल्याचे दर्शविते. तर पालाशचे प्रमाण भरपूर असल्याचे मृद चाचणी अहवालात म्हटले आहे. खरीप हंगामा तोडावर आला असून, शेतकऱ्यांची शेती नांगरणीसाठी लगबग सुरू अहे. शेती कामांना वेग आला आहे. मात्र सुपिकतेचा विचार करता बाब चिंता जनक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार हेक्टर लागवाडी खालील क्षेत्र आहे. यात खरीप हंगामात ५ लाख ६१ हजार तर रबी हंगामात २ लाख १८ हजार हेक्टरवर लागवड होते. गत काही वर्षांत मृद चाचणी अववाल चिंताजनक आकडेवारी दाखवित आहे. पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून जाण्यासोबत रासायानिक खतांचा दरवर्षी अतिवापर यामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत आहे. फिरती प्रयोग शाळा तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मातीचे ननुन्यांची तपासणी करून जमिनीची आरोग्य पत्रिका काढण्यात येते. त्यावरून सुपिकतेचे चित्र स्पष्ट होते. २०१६-१७ वर्षांत आठही तालुक्यातील ६४७ गावांतून ४४ हजार ९६० माती नुमन्यांची तपासणी करण्यात आली. २ लाख २२ हजार ८६५ शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे.
शेतजमिनीच्या सुपिकतेचे प्रमाण चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 23:43 IST