शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मनपा शाळेचीही गुणवत्ता वाढली

By admin | Updated: June 29, 2014 01:04 IST

औरंगाबाद : शहाबाजार येथील मनपाच्या उर्दू माध्यमातील इयत्ता दहावीचा निकाल ९६ टक्के लागला असून, आता मनपा शाळेनेही गुणवत्तेमध्ये उच्चांक गाठला आहे.

औरंगाबाद : शहाबाजार येथील मनपाच्या उर्दू माध्यमातील इयत्ता दहावीचा निकाल ९६ टक्के लागला असून, आता मनपा शाळेनेही गुणवत्तेमध्ये उच्चांक गाठला आहे. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला.विद्यार्थ्यांनी दहावीत आपली गुणवत्ता सिद्ध करून महानगरपालिका शाळेचा खालावलेला दर्जा उंचावल्याचा आनंद विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंदाच्या चेहऱ्यावर दिसत होता. मनपा आयुक्त डॉ. कांबळे यांनी सर्व शाळेतील शिक्षकांना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे अधिक लक्ष दिलेच पाहिजे, त्यासाठी अधिक परिश्रम केल्यास त्यातून मिळणारा आनंद वेगळाच असतो. अनेक उदाहरणे देऊन आणि मुलांच्या पुस्तकांपासून शिकवणीपर्यंतच्या सर्वच अडचणी समजावून घेतल्या आणि त्याचे तात्काळ निराकरण केले. त्यामुळे शैक्षणिकतेमधील मरगळ यशस्वी भरारी मारून विद्यार्थी- विद्यार्थिनींनी झटकून टाकत ‘हम भी किसीसे कम नही’ याप्रमाणे बौद्धिक ताकद दाखवून दिली. याचा अभिमान असल्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी गुणवंतांच्या सत्कारप्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले की, शहरातील विकासकामात एखाद्या रोडचे काम थांबले तरी चालेल; परंतु शिक्षणासाठी तडजोड नको, असे सांगून वर्षभर पुस्तकांपासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत व वाढीव तासिकांवरही लक्ष देऊन गुणवत्ता का वाढत नाही, यासाठी प्रयत्नशील होतो. अखेर मुलांनी गुणवत्ता सिद्ध केल्याने इतर खाजगी शाळांचेही विद्यार्थी प्रवेश घेत असल्याने हे मनपाच्या शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे यश असल्याचे डॉ. कांबळे म्हणाले.कार्यक्रमास संयोजक नगरसेवक मीर हिदायत अली, नगरसेवक सुरेश इंगळे, माजी नगरसेवक किशोर तुळसीबागवाले, मोहसीना बिल्किस, अनिल इरावणे, किरण डोणगावकर, शिक्षणाधिकारी अब्दुल मजीद, श्ोख मुनीर, सरफोद्दीन, मौलाना शम्मीउल्ला नदवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक नगरसेवक मीर हिदायत अली यांनी केले. सूत्रसंचालन शेख रशीदउन्निसा कुरैशी यांनी केले. आभार रईसा अय्युब खान यांनी मानले. पंजाबी सूट व पँट- शर्टचे वाटपवॉटर प्युरिफायरचे लोकार्पणउर्दूमध्ये सुरेख गीत सादरफटाक्यांच्या आतषबाजीने स्वागतगुणवत्तेचा आलेख ८० वरून ९० टक्क्यांवर नेणारतासिका शिक्षकांचा सत्कारस्पर्धात्मक अभ्यासाचा सल्ला