शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईस गेलेल्या मनपा पथकाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : संचारबंदीत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. काही दिवसांपासून ...

औरंगाबाद : संचारबंदीत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. काही दिवसांपासून व्यापारी दुपारी बारा वाजल्यानंतरही व्यवहार करीत असल्याने महापालिका प्रशासनाने शनिवारपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी रविवारी गणेश कॉलनी भागातील रशिदपुरा येथे मनपाचे पथक गेले असता धक्काबुक्की करण्यात आली. मात्र, मनपा अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली नसल्याचे समजते.

राज्य शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १ जूनपर्यंत कडक निर्बंध जाहीर केले आहेत. काही दिवसांपासून शहरात वर्दळ वाढली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर नेहमीप्रमाणे गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे शनिवारी मनपा प्रशासनाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आणि व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दहा पथके स्थापन केली. पहिल्या दिवशी या पथकांनी तब्बल शंभर व्यापाऱ्यांवर कारवाई करून २ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. रविवारी सुट्टीच्या दिवशी ही पथकांनी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली. झोन क्रमांक ३ अंतर्गत असलेल्या पथकाने गणेश कॉलनी भागातील रशिदपुरा येथे एका व्यापाऱ्याला नियोजित वेळेनंतर व्यवहार करताना पकडले. पथक दंडासाठी सरसावताच परिसरातील काही नागरिक जमा झाले. त्यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. काही तरुण पथकाच्या अंगावर धावून गेले. अधिकारी - कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी असलेले नागरी मित्र पथकातील सदस्य हे बघत होते. संबंधित व्यापाऱ्याला नंतर दंड आकारण्यात आला. मात्र, पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली नाही.

प्रशासनाने त्वरित विचारणा केली

कारवाईसाठी गेलेल्या पथकावर जमाव चालून आल्याचे कळताच संबंधित अधिकारी शहापूरवाड यांना गुन्हा दाखल करण्याची गरज आहे का, अशी विचारणा करण्यात आली. त्यांनी यासंदर्भात नकार दिला, असे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.