शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी आगार हिंगोलीत विलीन करण्याचा प्रस्ताव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 00:21 IST

कळमनुरी : नफ्यात चालणारे कळमनुरी येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार एकत्रिकरण व सुसूत्रीकरणाच्या नावाखाली हिंगोलीत समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : नफ्यात चालणारे कळमनुरी येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार एकत्रिकरण व सुसूत्रीकरणाच्या नावाखाली हिंगोलीत समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नागरिकांचा विरोध होऊ नये, यासाठी एसटी प्रशासन अत्यंत गोपनीय पद्धतीने काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, या निर्णयास प्रवासी संघटनेने विरोध दर्शविला असून वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा संघटनेने घेतला आहे.तत्कालीन आमदार रजनीताई सातव यांच्या प्रयत्नाने वर्ष १९९३ साली कळमनुरी येथे एसटीचे आगार सुरू करण्यात आले. सुरूवातीला अवघ्या १९ बसेसवर सुरू झालेल्या या आगारातून सध्या दरररोज ४० बसेस धावत आहेत. कळमनुरी आगाराने २० कलमी कार्यक्रम राबवून उत्पन्नाच्या बाबतीत अनेकदा राज्यातून प्रथम, परभणी विभागातील सात आगारांतून पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान कायम ठेवले आहे. दरम्यान, २० कि.मी. आतील क्षेत्रात जर एखादे दुसरे आगार असल्यास तर त्या आगारास जोडावे, असा शासन निर्णय झाल्यामुळे कळमनुरीतील आगार हिंगोली आगारात विलीन करण्याचा प्रस्ताव अत्यंत गोपनीय पद्धतीने तयार केल्या जात आहे. वास्तविक पाहता कळमनुरीच्या पुढे ६० कि.मी.पर्यंत दुसरे कोणतेच आगार नाही. तर पुसद, उमरखेड, नांदेड, वसमत हे आगार ६० कि.मी. पेक्षाही जास्त अंतरावर येतात. विशेष म्हणजे, ज्या आगारात विलीनीकरण होणार आहे. जिल्ह्याचे आगारच उत्पन्नाच्या बाबतीत व २० कलमी कार्यक्रम राबविण्यात मागे आहे. असे असतानाही विभागाकडून दुर्लक्षीत असलेले कळमनुरी आगार उत्पन्नाच्या बाबतीत मात्र नेहमी अग्रेसर राहिलेले आहे. नेहमी उत्पन्नाच्या बाबतीत क्रमवारीत असलेले कळमनुरीतील आगार हिंगोली आगारात वर्ग करण्याच्या जोरदार हालाचाली सध्या सुरू असल्याची माहिती आहे. तसे झाल्यास प्रवासी संघटनेच्या वतीने आंदोलन उभे केले जाणार असल्याचा इशारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांनी एसटी महामंडळाच्या कार्यकारी संचालक व मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत राजकीय स्तरावरही पडसाद उमटण्याचे संकेत आहेत.