शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अचारसंहितेच्या कचाट्यात अडकले पेयजल योजनेचे प्रस्ताव

By admin | Updated: January 13, 2017 00:42 IST

जालना : सहा महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाच्या पाणीपुरवठा विभागाला आठही तालुक्यातील मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या विविध कामांचे प्रस्ताव शासनाला सादर केले आहे.

जालना : सहा महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाच्या पाणीपुरवठा विभागाला आठही तालुक्यातील मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या विविध कामांचे प्रस्ताव शासनाला सादर केले आहे. परंतु सहा महिने उलटूनही याला मंजुरी मिळाली नाही. दरम्यान, जि.प.पं.स निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने हे प्रस्ताव मंजुरीसाठी रखडले आहेत. राष्ट्रीय पेयजल योजना बंद करून शासनाने २०१५ मध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना राज्यभर सुरू केली. या योजनेतून विहिरींतर्गत जलवाहिनी टाकणे, पंपिग मशिन, पाण्याची वितरण व्यवस्था, नळ दुरूस्ती आदी काम केली जातात. आठ तालुक्यातील प्रस्ताव जि.प. पाणी पुरवठा विभागाने मंजुरीसाठी शासनाला पाठविले आहेत. सहा महिन्यांनंतरही प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा कायम आहे. बुधवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आचारसंहितेमुळे कामे जैसे थेच आहेत. मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळत नसल्याने पेयजल योजनेचे विविध कमे कधी होणार याबाबत प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात अनेक गावातील कामे खडणार आहे. विशेष म्हणजे पाणीपुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री या खात्याचे प्रमुख असूनही जिल्ह्यातील प्रस्ताव कसे काय रखडल्याने तर्कविर्तक लावण्यात येत आहेत.काही दिवसांपूर्वीच पालकमंत्र्यांनी परतूर तालुक्यात पॉवर ग्रीड पाणी पुरवठा योजना मंजूर करून भूमीपूजनही केले. परंतु उर्वरीत तालुक्यांत मंजूर करण्यात आलेल्या विविध प्रस्तावांना मंजुरीच मिळाली नसल्याने विविध कामे प्रलंबित असून, उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा भासण्याची चिन्हे आहेत.