शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीत ७० कोटींची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे महापालिकेच्या तिजोरीला आर्थिक झळ बसली आहे. मागील तीन महिन्यांत तब्बल ७० कोटींनी वसुली कमी झाली ...

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे महापालिकेच्या तिजोरीला आर्थिक झळ बसली आहे. मागील तीन महिन्यांत तब्बल ७० कोटींनी वसुली कमी झाली आहे. मालमत्ता कराच्या माध्यमातून ६० कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना फक्त २७ कोटी वसूल झाले. पाणीपट्टीपोटी ३६ कोटी अपेक्षित असताना केवळ ५ कोटी ५० लाख रुपये मिळाले. त्यामुळे अत्यावश्यक कामे, दैनंदिन खर्चावर मर्यादा येत आहेत. कोरोना संसर्गापूर्वी उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था होती. त्यामुळे कंत्राटदारांच्या थकीत बिलांची रक्कम तब्बल २५० कोटींवर गेली होती.

महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मागील दीड वर्षांपासून आर्थिक नियोजन सुरू आहे. नागरिक मालमत्ता कर, पाणीपट्टी भरायला तयार नाहीत. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत मालमत्ता करापोटी ६० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात २७ कोटी वसूल झाले. पाणीपट्टीपोटी ३६ कोटी रुपयांची वसुली अपेक्षित होती; पण ६ कोटी ५० लाख रुपये जमा झाले. सरासरी ४० टक्केच वसुली झाली आहे. महापालिकेने शहरातील अनेक मालमत्ता भाड्याने दिल्या आहेत. त्यापोटी ३ महिन्यांत ८ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते; पण केवळ ५० लाख रुपये जमा झाले. मनपाचा दैनंदिन खर्च जशास तसा आहे. अत्यावश्‍यक कामांसाठी उत्पन्नातील ६५ टक्के रक्कम खर्च होते; पण केवळ ४० टक्केच वसुली झाल्यामुळे आर्थिक गणित बिघडत आहे.

---------

तीन महिन्यांतील वसुली

उद्दिष्ट-वसुली (आकडे कोटींत)

मालमत्ता कर -६०-२७

पाणीपट्टी ३६- ०६.५०

मालमत्ता विभाग ०८ - ००.५०

-----------

दरमहा अत्यावश्‍यक खर्च (आकडे कोटींत)

कर्मचाऱ्यांचे वेतन-२२

पाणीपुरवठा वीज बिल-०४

पथदिवे-००.७५ लाख

कर्जाचे हप्ते-०१

एसटीपी प्लांट वीज बिल-००.७० लाख

कर्मचारी पेन्शन-०३

शिक्षण विभाग-०२

बचत गट कर्मचारी वेतन-०१