शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी अतिरिक्त केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:05 IST

औरंगाबाद : मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयातच जावे लागत होते. नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक झोनमध्ये अतिरिक्त कर ...

औरंगाबाद : मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयातच जावे लागत होते. नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक झोनमध्ये अतिरिक्त कर भरणा केंद्र सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या केंद्रांवर नागरिकांना मालमत्ता कर, तसेच पाणीपट्टी भरता येईल.

कर निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी बुधवारी सांगितले की, नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी मनपाच्या ९ प्रभाग कार्यालयामध्ये जावे लागत होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, तसेच नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या सूचनेनुसार प्रभाग कार्यालयांतर्गत प्रत्येकी पाच वसुली केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येक प्रभागामध्ये एक केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. नागरिकांनी जवळच्या केंद्रावर त्वरित मालमत्ता कर, पाणीपट्टीचा भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रभागनिहाय कर भरणा केंद्रे...

प्रभाग- १ : वॉर्ड क्रमांक १७, नंदनवन कॉलनी, मनपा शाळा, उद्यानाच्या बाजूला

प्रभाग- २ : वाॅर्ड क्रमांक ५५, भवानीनगर, जुने प्रभाग कार्यालय, आरोग्य केंद्राजवळ

प्रभाग- ३ : वाॅर्ड क्रमांक २५, गणेश कॉलनी, मनपा शाळा.

प्रभाग- ४ : वाॅर्ड क्रमांक ४, चेतनानगर, मनपा शाळा

प्रभाग- ५ : वाॅर्ड क्रमांक ३९, अयोध्यानगर एन-७, मापारी हॉस्पिटलच्या पाठीमागे

प्रभाग- ७ : वाॅर्ड क्रमांक ८९, चिकलठाणा, मनपा शाळा

प्रभाग- ७ : वाॅर्ड क्रमांक ६५, सुराणानगर, सेव्हन हिल अग्निशमन केंद्र

प्रभाग- ८ : वाॅर्ड क्रमांक १०६, कांचनवाडी मनपा शाळा

प्रभाग- ९ : वाॅर्ड क्रमांक १०४, बन्सीलालनगर, मनपा शाळा