शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनपा देणार पर्यटनाला चालना

By admin | Updated: September 20, 2014 00:28 IST

औरंगाबाद : महापालिका शहराच्या ऐतिहासिकतेला उजाळा मिळावा यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याच्या विचारात आहे.

औरंगाबाद : महापालिका शहराच्या ऐतिहासिकतेला उजाळा मिळावा यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याच्या विचारात आहे. मुंबई, पुणे, ठाण्याच्या ट्रॅव्हल्स एजन्सींशी संपर्क साधून हा उपक्रम राबविण्यात येईल. ट्रॅव्हल्स पॅकेजमध्ये औरंगाबादमधील ऐतिहासिक स्थळांची माहिती देण्यासाठी खाजगी संस्थांना उद्युक्त केले जाईल. पर्यटकांचा औरंगाबादमध्ये मुक्काम वाढला तर त्याचा फायदा येथील रोजगाराच्या संधी वाढण्यात होईल. तसेच पालिकेच्या उत्पन्नातही काही प्रमाणात भर पडेल. नागरिकांच्या हाती पैसा येण्यास सुरुवात झाली तर त्यांची जीवनशैली सुधारण्यास मदत होईल. त्यांना पैसा मिळाला तर ते विविध करांचा भरणा करू शकतील, असा तर्क पालिका प्रशासन लावत आहे. रोजगार वाढण्यासाठी या उपक्रमाची मोठ्या प्रमाणात मदत होईल, असा पालिकेला विश्वास आहे. मनपातील काही बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात मुंबई, पुणे, ठाण्याच्या धर्तीवर खाजगीकरणातून पर्यटन विकास करावा, असा विचार आहे. मात्र, पालिका सत्ताधारी याला किती प्रतिसाद देतात यावर उपक्रम सुरू होणार, हे सर्व काही अवलंबून आहे. मनपाने पर्यटनस्थळांची केली पाहणीमहापालिकेने शहरातील पर्यटनस्थळ परिसरात १२ तासांमध्ये दोन वेळा साफसफाई करण्याचा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने आज अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी बीबीका मकबरा, पाणचक्की, सलीम अली सरोवर, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, मोलाना आझाद संशोधन केंद्र या पर्यटनस्थळांची पाहणी केली. शहरातील पर्यटनस्थळांना अनेक पर्यटक भेटी देतात. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ऐतिहासिक स्थळांचा परिसर स्वच्छ दिसावा, यासाठी टपरीचालक, दुकानदारांना स्वत: कचराकुंडी ठेवावी लागेल. त्याप्रकरणी आज पर्यटनस्थळ परिसरातील व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. मनपाचे पथक त्या कचराकुंडीतून कचरा गोळा करून घेऊन जाईल. दिवसातून दोन वेळा कचरा संकलन होईल. दुकान उघडणे आणि बंद होण्याच्या वेळेत मनपाचे पथक कचरा संकलनासाठी जाईल. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होणार आहे.