शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

बाबासाहेबांच्या विचारानेच प्रगती शक्य

By admin | Updated: December 31, 2014 01:05 IST

कन्नड : आंबेडकरी बनणे सोपे नाही, पावलोपावली किंमत मोजावी लागते. बाबासाहेबांचे मोठेपण या देशाने समजून घेतले नाही.

कन्नड : आंबेडकरी बनणे सोपे नाही, पावलोपावली किंमत मोजावी लागते. बाबासाहेबांचे मोठेपण या देशाने समजून घेतले नाही. त्यांच्याविषयीची द्वेषभावना अजून संपलेली नाही. आपल्या देशाचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे हे सर्व जग मान्य करीत असताना आपल्या देशातील जनता मात्र समजण्यास तयार नाही. बाबासाहेबांच्या वाङ्मयाचा नवयुवक जसजसा अभ्यास करतील तसतशी विचारांची क्रांती होईल. देश बाबासाहेबांच्या विचारानेच प्रगती करू शकतो अन्यथा नाही, असा दावा भीमपत्रिकेचे संपादक डॉ. एल. आर. बाली यांनी केला. मक्रणपूर येथे आयोजित मक्रणपूर परिषद व जयभीम दिन अमृतमहोत्सवी सांगता समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विचारांच्या क्रांतीपीठावर डॉ. अनिल कटारे, बलभीमराज गोरे, चंद्रभान पारखे, भैयाजी खैरकर, डॉ. अरविंद गायकवाड, रतन पंडागळे, उषा भालेराव, डॉ. प्रतिभा अहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग आदींची उपस्थिती होती. मक्रणपूर परिषद व जयभीम दिनाच्या अमृतमहोत्सवी सांगता समारंभात क्रांती घडविणाऱ्या विचारांची मशाल प्रज्वलित झाली. वेगवेगळ्या वक्त्यांनी मांडलेल्या विचारांनी मुग्ध झालेले श्रोते एकचित्ताने विचार ऐकत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिला, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सुरुवातीला मक्रणपूर परिषदेवर आधारित ‘डॉक्युमेंटरी’ दाखविण्यात आली. त्यानंतर गौतम बुद्धांच्या मूर्तीस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर जयभीम फलकाचे अनावरण डॉ. एल.आर. बाली यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार झाला. डॉ. एल. आर. बाली यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. बुद्धप्रिय कबीर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. अनिल कटारे, भैयाजी खैरकर यांची आंबेडकरी विचारांची प्रगल्भता सांगणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण मोरे यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना युवकांनी इतिहासाचा बोध घेऊन चळवळीस चालना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले.