शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या सतरा दिवसांत निघतेय तुतीचे उत्पादन...!

By admin | Updated: December 28, 2016 00:06 IST

जालना : नवीन तंत्रज्ञानानुसार आता तुतीचे उत्पादन अवघ्या सतरा दिवसांत निघत आहे.

जालना : नवीन तंत्रज्ञानानुसार आता तुतीचे उत्पादन अवघ्या सतरा दिवसांत निघत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा शेतकरी अवलंब करीत असून, त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे चित्र आहे. यावर्षांत जिल्ह्यात १०१ मेट्रिक टन तुतीचे उत्पादन निघून शेतकऱ्यांनी सुमारे ४ कोटींचे उत्पादन मिळविले आहे. राज्यात मराठवाडा उत्पादनात द्वितीय स्थानी असून, विदर्भात जालना जिल्ह्याच्या तुलनेत उत्पादन कमी आहे. जिल्ह्यात ९४१ एकरवर ८९१ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली होती. जुन्या लागवड पद्धतीऐवजी नवीन पद्धत आली आहे. आता शेतकऱ्यांना थेट तुतीच्या अळ्या देण्यात येतात. यातून पंधरा ते सतरा दिवसांत हे उत्पादन निघते. तुतीपासून रेशीमचा भाव प्रति क्विंटल ३० ते ४० हजार क्विंटल दरम्यान आहे. १०१ मेट्रिक टन पाहता याद्वारे शेतकऱ्यांना तब्ब्ल चार कोटी रूपयांचे उत्पादन निघाल्याची माहिती विभागीय रेशी उपसंचालक दिलीप हके यांनी सांगितले. राज्यात तुती लागवड ८३३६ एकर एवढी होती. त्यापैकी ४०९८ एकर क्षेत्र मराठवाड्यात आहे. क्षेत्राचा विचार करता मराठवाड्यात ३४४ मेट्रिक टन तुतीचे उत्पादन झाले. तर जालना जिल्ह्यात १०१ मेट्रिक टन तुतीचे उत्पादन निघाले आहे. नवीन शेतकऱ्यांना लागवडीसाठी जानेवारीपासून शेतकऱ्यांनी तयारी करावी. नवीन तंत्रज्ञानानुसार शेतकऱ्यांना माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे हके यांनी सांगितले. पारंपरिक शेतीला एक चांगला पर्याय म्हणून रेशीम शेती असून, याचा जिल्ह्यातील शेतकरी फायदा घेत आहे. इतर शेतकऱ्यांनीही रेशीम शेतीकडे वळावे म्हणून रेशीम कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)