शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

गुणवत्तेच्या प्रवासाला गरिबीची अडचण !

By admin | Updated: June 22, 2014 00:06 IST

हरी मोकाशे , लातूर ंआर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असली तरी त्यावर मात करीत जिद्दीने दहावीपर्यंतचे शिक्षण ९६़२० टक्के गुण घेऊन पूर्ण करीत अक्रमने गरुडझेप घेतली आहे़

हरी मोकाशे , लातूरंआर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असली तरी त्यावर मात करीत जिद्दीने दहावीपर्यंतचे शिक्षण ९६़२० टक्के गुण घेऊन पूर्ण करीत अक्रमने गरुडझेप घेतली आहे़ त्याच्या गुणवत्तेच्या प्रवासाला आता आर्थिक अडचणीची खीळ बसली आहे, ती गरिबीची़ त्यामुळे पुढील शिक्षण घेऊन मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचे कसे? असा यक्षप्रश्न अक्रम आणि त्याच्या पालकासमोर उभा राहिला आहे़शहरातील हत्तेनगरात भाड्याच्या घरात अक्रम गौस सय्यद राहतो़ त्याचे माध्यमिकचे शिक्षण शहरातील ज्ञानेश्वर विद्यालयात झाले असून नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात त्याने ९६़२० टक्के गुण घेऊन गरुडझेप घेतली आहे़ अक्रमची परिस्थिती अत्यंत बिकट आहे़ शहरातील सुभाष चौक परिसरात वडिलांचा पानटपरीचा व्यवसाय आहे़ कुटुंबात अक्रमसह अन्य तीन लहान भावंडे असल्याने दररोजची कमाई ही दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि घरचे भाडे भरण्यासाठीच खर्च होत आहे़दहावीतील अक्रमला शिक्षणासाठी पैसा कमी पडत असल्याने त्याच्या वडिलांनी पतसंस्थेचे कर्जही काढले आहे़ वडींल घेत असलेल्या कष्टाची आणि गरिबीची जाणीव असलेल्या अक्रमने दररोज तीन ते चार तास अभ्यास करून दहावी परीक्षेत यश संपादन केले आहे़ विशेष म्हणजे वडिलांना व्यवसायात त्याची मोठी मदत होत आहे़ त्यामुळे त्याच्या वडिलाचे स्वप्न साकार होण्यास सुरुवात होत असली तरी मुलाचे उच्च माध्यमिकचे शिक्षण कसे पूर्ण करायचे असा प्रश्न त्यांना सतत भेडसावत आहे़ एवढे गुण घेतलेल्या मुलास चांगल्या संस्थेत शिक्षण देण्याची ऐपत नाही याची त्यांच्या मनात सतत सल टोचत आहे़ मुलगा गुणवान असूनही केवळ निर्धरन असल्याने त्याचे भवितव्य कसे घडेल याची कुटुंबियांसमोर चिंता निर्माण झाली आहे़ स्वत: अक्रमही याच चिंतेने अस्वस्थ असून आता कोण दाखविल आयुष्याला पुढची वाट अशा आशेवर तो उभा आहे़मुलाचे शिक्षण पूर्ण करणार...आम्ही स्वत:चे नाव लिहिण्यापुरते साक्षर असलो तरी मुलगा दररोज कितीवेळ अभ्यास करीत असतो? त्याला अवघड वाटणारा विषय कोणता? त्याचा आवडता विषय कोणता हे विचारण्यासाठीही मला वेळ मिळत नाही़ घरातील मंडळींकडूनच तो दररोज अभ्यास करतो का? याची नेहमी चौकशी करीत असत़ आपल्या अभ्यासाबरोबर माझ्या व्यवसायातही त्याची मदत आहे़ कितीही कर्ज झाले तरी त्याचे शिक्षण पूर्ण करणार असल्याचे त्याचे वडील गौस सय्यद यांनी सांगितले़मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचंय़़़माझी परिस्थिती हलाखीची असली तरी पुढील शिक्षण घेण्याची जिद्द आहे़ त्यासाठी वेळप्रसंगी आपण स्वत: काम करुन शिक्षण पूर्ण करणार आहे़ मला मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचं आहे, असे अक्रम सय्यद याने सांगितले़