शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकाचा कॉक हेअर स्टाइलमधील हटके अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:02 IST

-अभिनेत्री प्रियंका चोप्राने नव्या अंदाजात एक फोटोशूट केले आहे. हे फोटो आता सोशल मीडियातून समोर आले असून, सगळीकडे तिचीच ...

-अभिनेत्री प्रियंका चोप्राने नव्या अंदाजात एक फोटोशूट केले आहे. हे फोटो आता सोशल मीडियातून समोर आले असून, सगळीकडे तिचीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती हटके अंदाजात दिसून येत आहे. खासकरून तिची हेअरस्टाइल. कॉक हेअरस्टाइलमुळे तिचा संपूर्ण लूक चेंज झाला आहे. तिला पाहून असं वाटतं की, तिने हेअर कट केला आहे; परंतु प्रियंकाने कोणताही हेअरकट केलेला नसून तिने केस बांधले आहेत. तसेच तिने केस वेगळ्या प्रकारे सेट केले आहेत. तसेच फोटोशूटमध्ये ती वेगळ्या स्टाइल्सच्या ड्रेसेसमध्ये दिसून आली आहे. केवळ भारतातच नाहीतर, हॉलिवूडमध्येही प्रियंकाच्या या फोटोशूटची चर्चा होत आहे.

क्रिकेटर इरफान पठाणची चित्रपटात एन्ट्री

भारतीय क्रिकेट टीमचा माजी ऑलराऊंडर खेळाडू इरफान पठाण आता चित्रपटात आपला दम दाखवणार आहे. इरफान तमिळ चित्रपट ‘कोबरा’ (Cobra) मधून तो सिनेजगतात येतोय. ‘कोबरा’ चित्रपटाचा टीझर देखील नुकताच रीलिज झाला आहे. अल्पवधीतचा टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटात सुपरस्टार विक्रम मुख्य भूमिकेत असून इरफानची छोटी पण महत्त्वाची भूमिका असणार आहे. चियान विक्रम या चित्रपटात भारतीय हेराची भूमिका साकारत असून, बऱ्याच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे, तर इरफान एका तुर्की इंटरपोल अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. अजय गनामुत्थु हे सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, तर केएस रवी कुमार, श्रीनिधी हे सहकलाकार आहेत.

साडी आणि सोज्वळतेसोबत सईचे फोटोशूट

अभिनयासह फॅशन आणि स्टाइलबाबत सई ताम्हणकर तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाइलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला ती अधिक प्राधान्य देते. सईने नुकतेच साडी परिधान केलेले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिने ग्रे रंगाची साडी परिधान केली आहे. साडी और सादगी के संग संग .. असं कॅप्शन सईने या फोटोंना दिले आहे. फॅन्सनाही साडीमधला तिचा हा अंदाज आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सई सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शोमध्ये जजच्या भूमिकेत आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच ‘कलरफुल’ या चित्रपटात दिसणार आहे.