शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्कमध्ये प्रियंकाने सुरू केले भारतीय रेस्टॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:02 IST

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचे न्यूयॉर्कमध्ये एक इंडियन रेस्टॉरंट सुरू होत आहे. प्रियंकाने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती देऊन रेस्टॉरंटच्या ...

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचे न्यूयॉर्कमध्ये एक इंडियन रेस्टॉरंट सुरू होत आहे. प्रियंकाने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती देऊन रेस्टॉरंटच्या पूजेचे फोटो शेअर केले आहेत. तिने लिहिले, ‘न्यूयॉर्क सिटीत सादर आहे, एक नवे रेस्टॉरंट सोना. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय खाद्यपदार्थांबद्दलचे माझे प्रेम मिळेल. भारत आणि ज्या चवीसोबत मी मोठे झाले, त्याची झलक येथे तुम्हाला पाहायला मिळेल. सोना या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होत आहे, आपली प्रतीक्षा असेल.’ शेअर केलेल्या पहिल्या फोटोत तिच्या रेस्टॉरंटचे नाव आहे. दुसऱ्या फोटोत प्रियंका आणि तिचा मित्र मनीष दिसतोय, तर तिसऱ्या फोटोत ती पती निकसोबत दिसतेय.

पूजा सावंतचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज

पूजा सावंतने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने सोशल मीडियात नुकतेच एक फोटोशूट शेअर केले आहे. हे फोटोशूट ब्लॅक ड्रेसमध्ये आहे. यात फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. ब्लॅक रंगाच्या ड्रेसने पूजाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. फोटोला तिने आकाशगंगेत चालताना असे सुंदर कॅप्शन दिले आहे. यावर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट करून प्रशंसा करत आहेत. लवकरच पूजा 'दगडी चाळ २'मध्ये दिसणार आहे. सध्या पूजा महाराष्ट्राच्या बेस्ट डान्सरमध्ये परीक्षकाची भूमिका साकारते आहे.

'घोस्ट रायडर'ने केले पाचवे लग्न

हॉलिवूडपट घोस्ट रायडरचा अभिनेता निकोलस केज हा त्याच्या चित्रपटासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. त्याने नुकतेच लग्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ५७ वर्षीय निकोलस केजने २६ वर्षीय जपानी गर्लफ्रेंड रिको शिबाटासोबत लाल वेगास येथील एका हॉटेलमध्ये लग्न केलं. निकोलसचे हे पाचवे लग्न असून, त्याची पत्नी त्याच्यापेक्षा तब्बल ३१ वर्षांनी लहान आहे. निकोलसने ‘हो हे खरे आहे आणि आम्ही दोघेही आमच्या या नव्या नात्यामुळे प्रचंड खूश आहोत’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. निकोलसने अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले असून, त्यानंतर छोटंसं सेलिब्रेशन देखील ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे निकोलसची एक्स पत्नीदेखील यावेळी उपस्थित होती.